kirit somaiyaa ajit pawar
kirit somaiyaa ajit pawar 
महाराष्ट्र

५ ऑक्‍टोबरला 'जरंडेश्वर'ला येईन; सोमय्यांचे संचालकांना आश्वासन

ओंकार कदम

सातारा : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्याला सुरवात झाली आहे. साेमवारी रात्री उशिरा ते सातारा येथील शासकीय विश्रामगृह येथे दाखल झाले होते आज (मंगळवार) सकाळी लवकर जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी त्यांची भेट घेऊन लिलाव प्रक्रियेत झालेल्या भ्रष्टाचाराबाबत त्यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना जरंडेश्वरबाबत झालेल्या गोष्टींची शहानिशा करण्यासाठी मी कारखान्याला भेट देणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी पवार kirit somaiyaa ajit pawar कुटुंबियांवर जोरदार टीका केली. satara-jarendeshwar-cooperative-sugar-factory-koregoan-kirit-somayiaa-ajit-pawar-sml80

जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निलावात झालेल्या घोटाळा प्रकरणी जरंडेश्वर कारखान्याचे २० जणांचे शिष्टमंडळ आज (मंगळवार) किरीट सोमय्या यांना येथील शासकीय विश्रामगृहात भेटले. यावेळी जरंडेश्वर लिलाव प्रकरणी झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

किरीट सोमय्या यांनी येत्या पाच ऑक्‍टोबरला जरंडेश्वर कारखान्याला भेट देणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्या बाबत घडणाऱ्या सर्व गोष्टींच्या पाठीमागे अजित पवारच आहेत असा धक्कादायक आरोप जरंडेश्वर सहकारी साखर कारखानाचे उपाध्यक्ष शंकरराव भोसले यांनी यावेळी केला. 

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Unseasonal Rain: अवकाळीच्या तडाख्याने भलेमोठे झाड कोसळले, ५ घरे जमीनदोस्त; चिमुकलीसह वृद्ध दांपत्य जखमी

Thane Election Voting LIVE : ठाण्यात ईव्हीएम मशीनचा खोळंबा, मतदार ताटकळले

Maharashtra Rain Update: राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, कोणत्या जिल्ह्यांमध्ये घातलं अवकाळी पावसानं थैमान?

Pune Traffic News : पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; मेट्रोच्या कामामुळे 'या' भागातील रस्ते राहणार बंद

Narendra Modi: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात विक्रमी मतदान करा; पंतप्रधान मोदीचं मतदारांना आवाहन

SCROLL FOR NEXT