GBS Case In Satara Saam Tv
महाराष्ट्र

GBS Case In Satara : पुणे, नागपूरनंतर साताऱ्यात जीबीएसचा शिरकाव? ४ संशयित रुग्ण आढळले

GBS Cases Update : साताऱ्यामध्ये सध्या जीबीएसचे चार संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. हे चारही रुग्ण १५ वर्षांच्या आत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Yash Vaidya

ओमकार कदम, साम टीव्ही, प्रतिनिधी

GBS Case In Satara : राज्यामध्ये जीबीएस म्हणजेच गुलियन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. पुण्यात या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आहेत. पुण्यासह सांगली, नागपूर अशा अन्य जिल्ह्यांमध्येही जीबीएसने शिरकाव केला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये या आजाराचे चार संशयित रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे.

सातारा जिल्ह्यात जी बी सिंड्रोमचे ४ संशयित रुग्ण सापडले आहेत. हे सर्व रुग्ण १५ वर्षांच्या आत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. एकूण ४ रुग्णांपैकी २ रुग्णांवर साताऱ्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एक रुग्ण खासगी रुग्णालयात, एक रुग्ण कराडच्या कृष्णा रुग्णालयात असल्याची माहिती समोर आली आहे.

चारही मुलांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रयोग शाळेतील वैद्यकीय तपासणीनंतर जीबीएसचे निदान स्पष्ट होईल. दूषित पाणी आणि अन्न यांमुळे हा आजार बळावला आहे. अचानक हातपाय लुळे पडले असतील, तर शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलीपे यांनी म्हटले आहे.

जीबीएसमुळे काल पुणे शहरात एका ५६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही महिला कॅन्सरने पीडित होती. त्याआधी सोलापूरच्या ४० वर्षीय नागरिकाचा बळी जी बी सिंड्रोमने घेतला होता. पुण्यात या आजाराचे सर्वाधिक १२७ रुग्ण आहेत. जीबीएसवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fort In Mumbai : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार, वांद्रेपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

SCROLL FOR NEXT