जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे ग्रामीण भागाचा आर्थिक कणा. त्यामुळे जिल्हा बँकेवर सत्ता मिळवण्याचा मोह मंत्र्यांनाही आवरता येत नाही. त्यामुळेच नफ्यात असलेल्या सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चार मंत्र्यांसह दोन खासदार आणि तीन आमदार आखाड्यात उतरलेत. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी एकूण २३६ अर्ज दाखल झालेत. नियामक अडचणी टाळण्यासाठी अनेक नेत्यांनी कुटुंबातील सदस्यांचे पर्यायी डमी अर्ज भरले आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोण-कोण दिग्गज उतरलेत ते पाहूया..
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत दिग्गज
शिवेंद्रसिंहराजे भोसले -सार्वजनिक बांधकाममंत्री
मकरंद पाटील - मदत आणि पुनर्वसनमंत्री
जयकुमार गोरे - ग्रामविकासमंत्री
शंभूराज देसाई, पालकमंत्री
नितीन पाटील, खासदार, राष्ट्रवादी (AP)
उदयनराजे भोसले, खासदार, भाजप
शशिकांत शिंदे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी (SP)
रामराजे नाईक निंबाळकर, माजी मंत्री, राष्ट्रवादी (SP)
बाळासाहेब पाटील, माजी मंत्री, राष्ट्रवादी (SP)
रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी खासदार, भाजप
डॉ अतुल भोसले, आमदार, भाजप
धैर्यशील कदम, आमदार, भाजप
दीपक चव्हाण, माजी आमदार, राष्ट्रवादी (SP)
दुसरीकडे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरु असल्याचं भाजप नेत्यांनी सांगितलंय. तर समविचारी नेते एकत्र आल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांनी केलंय.
'अजून फॉम्युर्ला ठरला नाही. बिनविरोधसाठी प्रयत्न सुरु'
शिवेंद्रराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री
'निवडणुकीत समविचारी नेते एकत्र आलेत'
मकरंद पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री
मुळात सातारा बँकेची आर्थिक स्थिती उत्तम असल्यामुळेच दिग्गच बँकेच्या निवडणुकीत उतरल्याचं दिसतंय.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. बँकेला या वर्षाअखेर 201 कोटी 26 लाख रुपयांचा करपूर्व नफा झाला. बँकेचा एकूण व्यवसाय 20,432 कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. स्वनिधीत 122 कोटींची भर पडली आहे.
बँक ताब्यात असेल तर ग्रामीण भागाशी नाळ घट्टेपणे जोडली जाते. कार्यकर्त्यांची कामे करता येतात. त्यामुळे मंत्री, आमदार, खासदारही निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेत. मात्र 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या छाननीनंतर आणि उमेदवारी माघारीच्या टप्प्यातच प्रत्यक्ष लढतींचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.