₹2 lakh bid secures voting right during Kodoli society resolution meeting in Satara saam tv
महाराष्ट्र

2 लाखांना विकला मतदानाचा अधिकार, कराडमध्ये लोकशाहीचा लिलाव

Satara District Bank Voting Right Auction-2 Lakh: सातारा जिल्हा बँकेत मतदार होण्यासाठी चक्क 2 लाख रुपयांची बोली लावण्यात आलीये. कोडोली गावातील विकास सेवा सोसायटीच्या ठरावादरम्यान हा प्रकार घडलाय. यशवंतरावांच्या भूमीत मताच्या अधिकाराचा लिलाव नेमका कशासाठी झालाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Rohit Kadam

देशात सशक्त लोकशाहीसाठी भारतीय राज्यघटनेनं प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिलाय. मात्र, हाच मतदानाचा अधिकार चक्क लाखो रुपयांना विकला गेलाय. सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रतिनिधी नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी जिल्ह्यातल्या गावोगावच्या विविध कार्यकारी सोसायट्यांना मतदानाचा अधिकार असतो. मात्र यातल्या केवळ एकाच संचालक मतदान करता येतं. त्यासाठी संबंधित संचालकाच्या नावानं ठराव करावा लागतो. त्यामुळे अनेक ठिकाणी सोसायट्यांच्या संचालकांमध्ये ठरावावरून वाद निर्माण झाल्याच्या घटना समोर येतायत. मात्र यावर कराडमधल्या कोडोलीच्या ग्रामस्थांनी भन्नाट शक्कल लढवली...नेमकं काय केलं ते पाहूयात. ..

कराड तालुक्यातल्या कोडोली ग्रामविकास सेवा सोसायटीनं ठरावासाठी बैठक आयोजित केली. या बैठकीत संचालक मंडळानं संस्थेला भरीव आर्थिक मदत करणाऱ्याच्या नावे ठराव करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी थेट लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली. या लिलावात संचालक आनंदराव जगताप यांनी 1 लाखाची बोली लावली. मात्र यावर विक्रमसिंह जगताप यांनी 2 लाख रुपयांची बोली लावून जिल्हा बँकेत मतदानाचा अधिकार मिळवला.

विशेष म्हणजे विक्रमसिंह जगतापांनी लेगचच दोन लाखांचा चेकही संस्थेला सुपूर्द केला. मात्र य़शवंतराव चव्हाणांच्या कराडमध्ये मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी लिलावात लाखांची बोली लागल्यामुळे राज्यभर याची चर्चा रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

साखरेचे दर शंभरी पार जाणार? ऐन सणासुदीत साखर क़डू

नागपूरमध्ये क्लोरीन वायूची गळती, 40 जणांवर उपचार, 5 गंभीर, जलशुद्धीकरण प्रकल्प भरवस्तीत कसा?

कचोरी आणि बिर्याणीत उंदरांच्या लेंड्या, किळसवाण्या प्रकारामुळे नागरिकांचा संताप

भंडारा, महाप्रसादासाठी FDAची परवानगी बंधनकारक; नियमांचं उल्लंघन केल्यास गुन्हा होईल दाखल

रुग्णालयातील आगीत 3 बालकांचा होरपळून मृत्यू, नवजात निष्पापांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT