ncp office satara 
महाराष्ट्र

शिंदे साहेबांचा गेम करणा-यांचा निषेध! एनसपी कार्यालय फाेडले

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळासाठी रविवारी मतदान झाले. आज (साेमवार) सकाळपासून मतमाेजणीस प्रारंभ झाला आहे.

Siddharth Latkar

सातारा : एनसीपीचे (ncp) आमदार शशिकांत शिंदे (shashikant shinde) यांचा जिल्हा बॅंक निवडणुकीत एक मताने पराभव झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी नाराजीतून सातारा जिल्हा राष्ट्रवादी कार्यालय फाेडले. यावेळी समर्थकांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाला केराची टाेपली दाखविणा-यांचा निषेध नाेंदविला.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत जावली प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघात आमदार शशिकांत शिंदे यांचा एक मताने पराभव झाला. त्यांना २४ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांना २५ मते मिळाली. ज्ञानदेव रांजणे यांच्या विजयानंतर आमदार शिंदे यांचे समर्थकांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यालयास लक्ष केले.

तेथे काही कार्यकर्त्यांनी कार्यालयावर दगडफेक केली. काहींनी काचा फाेडल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार साहेबांचा गेम करणा-यांना त्यांची जागा दाखवून देणार. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांचे एेकले जात नाही अशी खंत व्यक्त केली. यावेळी महिला आघाडीने देखील आजच्या निकालाचा निषेध नाेंदविला.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भोंदू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल

Success Story: १०वी-१२वीत टॉपर; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; IFS आदिती यांचा प्रेरणादायी प्रवास

Nashik Accident: दिंडोरीत भीषण अपघात; कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा मृत्यू

किडनी विकणाऱ्या शेतकऱ्याला हवं इच्छामरण; जीवंतपणीच्या मरणयातना कधी थांबणार? VIDEO

शिवसेनेच्या इतिहासावरून नाईकांचा शिंदेंना अप्रत्यक्षपणे टोला; एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांचा वाद पुन्हा पेटणार?

SCROLL FOR NEXT