Satara Koregaon Crime News Saam TV
महाराष्ट्र

Satara Crime News: शेतजमिनीचा वाद विकोपाला; जावयाने चक्क चुलत सासऱ्यालाच संपवलं

Koregaon News: एका जावयाने शेतजमिनीच्या वादातून आपल्याच चुलत सासऱ्यावर गोळीबार केला.

ओंकार कदम

Satara Crime News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यातील बहुतांश गुन्हे हे खंडणी, प्लॉटिंग, शेतजमिनीच्या वादातून घडत आहे. अशीच एक धक्कादायक घटना साताऱ्यातून समोर आली आहे. येथे एका जावयाने शेतजमिनीच्या वादातून आपल्याच चुलत सासऱ्यावर गोळीबार केला. (Latest Marathi News)

या घटनेत चुलत सासऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. सुनील शंकर भोईटे असे गोळीबारात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय. संदीप बळवंत यादव आणि रवी बळवंत यादव, अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. (Breaking Marathi News)

सातारा (Satara) जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातल्या वाघोली गावात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील शंकर भोईटे आणि यादव यांच्यात शेतजमिनीचा वाद सुरू होता.

या वादातून संदीप बळवंत यादव आणि रवी बळवंत यादव या दोघांनी भोईटे यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात भोईटे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत भोईटे यांचा मृतदेह ताब्यात घेतला. तसेच तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपींना अटक केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

SCROLL FOR NEXT