Satara News Saam tv
महाराष्ट्र

Shocking Video : खळबळजनक! दरोडेखोरांनी अवघ्या २ मिनिटातच लुटले ४० लाखांचे दागिने; लुटमारीचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

Satara News : रात्री उशिरापर्यंत दागिने घडवण्याचे काम चालते. यावर नजर ठेवून असलेल्या चोरट्यांनी २८ जुलैला रात्री उशिरापर्यंत काम सुरु असताना संधी साधली

Rajesh Sonwane

ओंकार कदम
सातारा
: साताऱ्यातील वाई शहरात सोन्याचे दागिने बनवणाऱ्या छोट्याशा कारखान्यावर अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकला. यात चोरट्यांनी ४० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून घेऊन गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून या आधारे पोलिसांकडून शोध सुरु करण्यात आला आहे. 

साताऱ्यातील (Satara) वाई येथील सोने चांदीच्या बाजारपेठेत लक्ष्मीनारायण मार्केटमध्ये ही घटना २८ जुलैला रात्री उशिरा घडली. सोने चांदीच्या बाजारपेठेत संजय आणि मृत्युंजय जयंता मयंती या दोन भावांचे सोन्याचे दागिने बनविण्याचे कारखाना आहे. या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत दागिने घडवण्याचे काम चालते. यावर नजर ठेवून असलेल्या चोरट्यांनी २८ जुलैला रात्री उशिरापर्यंत काम सुरु असताना संधी साधली. (Crime News) चोरट्यांनी कारखान्यात प्रवेश करत कोयता आणि पिस्तूलचा धाक दाखवून तेथील कामगारांना धमकावले व ४० लाख किमतीचे सोन्याचे दागिने लुटले. 

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध सुरु 

सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत माहिती घेतली. कारखान्यात असलेल्या (CCTV) सीसीटीव्ही कॅमेरात संपूर्ण प्रकार कैद झाला असून पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज घेतले असून त्या आधारावर तपास सुरू आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT