ओंकार कदम|सातारा, ता. २४ ऑगस्ट २०२४
साताऱ्यामधून एक मोठी अपघाताची बातमी समोर आलीआहे. सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते, माण खटाव विधानसभेचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील गाडीने एका दुचाकीस्वाराला उडवले असून यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दुसऱ्या जखमी तरुणाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते, माण- खटाव विधानसभा मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. आमदार गोरे यांच्या ताफ्यातील गाडीने एका दुचाकीला उडवले असून यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला होता, त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दहिवडीजवळील बिदाल शेरेवाडी भागामध्ये ही अपघाताची घटना घडली. आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील एसयुव्हीने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून तर एक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. अपघातानंतर जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हा अपघात इतका भीषण होता की, आमदारांच्या ताफ्यातील गाडीचे मोठे नुकसान झाले आहे तर धडक दिलेल्या दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.