Bail 
महाराष्ट्र

निष्ठुरतेचा कळस; बैलाची पाय तोडून,फास लावून हत्या

ओंकार कदम

सरताळे गावापासून काही अंतरावरील निर्जनस्थळी ही घटना घडलेली आहे. संबंधितांचा शाेध लावून तातडीने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असा सूर परिसरातील शेतक-यांचा आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील jawali सरताळे परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. क्रूरतेने बैलाचा पाय तोडून त्याच्या गळ्याला दोरीचा फास आवळून त्याची हत्या करण्यात आली आहे. सरताळे गावापासून काही अंतरावरील निर्जनस्थळी ही घटना घडलेली आहे. संबंधितांचा शाेध लावून तातडीने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असा सूर परिसरातील शेतक-यांचा आहे. (satara-breaking-news-bail-killed-sartale-jawali-police-investigation-begins)

घटनास्थळावर बैलाच्या अंगावर कुर्‍हाडीचे घाव घातल्याचे दिसत आहेत. त्याचे शेपूट तोडले असून फास लावून अमानुष हत्या करण्यात आली आहे. या बैलाचा एक पाय तोडला असून त्यास निलगिरीच्या झाडाला फास लावून लटकवून टाकले हाेते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. खिलार जातीच्या बैलाची अशा पद्धतीने अमानुष हत्या नेमकी का करण्यात आली याचा तपास सध्या पोलिस करत आहेत.

काेणाचे काय बिघडवले हाेते या मुक्या प्राण्याने ?

शेतक-यांचा जीवाभावाचा सखा समजल्या जाणा-या बैलाची केलेली हत्या संतापजनक आहे. संबंधित बैल अत्यंत तगडा हाेता. ताे शर्यतीचा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मुक्या प्राण्याचा नेमका काय दाेष हाेता ? त्याला ठार करण्याइतपत पर्यंत मजल गेली.

दरम्यान माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेने जावळी तालुका हादरून गेला आहे. याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नमाज पठाणावरुन शनिवारवाड्यात आंदोलन

Parineeti Chopra: परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा; अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलाचे आगमन

Raigad : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास दिरंगाई; पेणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिक मागो आंदोलन

Diwali Bad Impact: दिवाळीत 'या' 5 चुका मुळीच करू नका, भोगावे लागतील मोठे परिणाम

IND Vs AUS : रोहित-विराटचा कमबॅक फसला, गिल-अय्यरही फ्लॉप; ऑस्ट्रेलियाचा भारतावर सहज विजय

SCROLL FOR NEXT