satara bjp corporator agitation in muncipal corporation office 
महाराष्ट्र

सातारा पालिकेत नगरसेवकाने बादलीभर पाणी ओतून नाेंदविला निषेध

यावेळी पालिकेच्या कारभारा विरोधात जोरदार घोषणा देखील देण्यात आल्या.

ओंकार कदम

सातारा : सातारा (satara) पालिके समाेरील पाण्याचा व्हाॅल्व्हला लागलेली गळती काढावी या मागणीसाठी भाजपच्या (bjp) नगरसेवकाने आज (साेमवार) सातारा पालिका कार्यालयातील अतिरिक्त मुख्याधिकारी यांच्या दालना बाहेर बादली भर पाणी ओतून कारभाराचा निषेध नाेंदविला.

सातारा पालिकेच्या समोरच पाण्याच्या व्हॉल्व्हला गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया चालले होते. हे सर्वांना दिसत हाेते मात्र त्याबाबत काेणीच काही हालचाली करीत नव्हते. आज सातारा पालिकेच्या कारभारा विरोधात संतापलेल्या भाजपचे नगरसेवक सुनील काळेकर यांनी चक्क पालिकेत असणाऱ्या अतिरिक्त मुख्याधिकारी यांच्या कक्षा बाहेर पाणी ओतून निषेध व्यक्त केला.

नगरसेवक सुनील काळेकर यांनी गळतीमधून पडणारे पाणी घेऊन हे आंदोलन (satara bjp corporator agitation in muncipal corporation office) केले. यावेळी पालिकेच्या कारभारा विरोधात जोरदार घोषणा देखील देण्यात आल्या. काेळेकर यांच्या समवेत त्यांचे कार्यकर्ते आंदाेलनात सहभागी झाले हाेते.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow Colour Saree: श्रावणातल्या खास सणासुदींसाठी नेसा ही पिवळ्या रंगाची आकर्षक साडी

Maharashtra Live News Update : पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

Amar Kale : योजनांवर कोट्यावधीचा खर्च मात्र शिक्षणावर दुर्लक्ष; खासदार अमर काळे यांची सरकारवर टीका

सकाळी उठण्याची योग्य वेळ कोणती?|What Is The Best Time To Wake Up in the Morning

Maharashtra Politics : महायुती आणि मविआला हादरा; राज्यात नव्या आघाडीची नांदी, कुणाला फायदा अन् फटका?

SCROLL FOR NEXT