Satara bikes Accident SAAM TV
महाराष्ट्र

Satara Accident : साताऱ्यात दोन दुचाकींची समोरासमोर धडक, भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार

Satara bikes Accident: दोन्ही दुचाकींचा हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

Prachee kulkarni

Satara News: साताऱ्यातील लोणंद महामार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. स्वराज स्वरूप कुमार जानकर (वय २४) रा. पाडेगाव ता. खंडाळा आणि सुप्रीम सुभाष शिंदे (वय २४) रा. बलवडी ता. सांगोला जिल्हा सोलापूर अशी दोन्ही मृत व्यक्तींची नावं आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सातारा लोणंद महामार्गावरील पिंपोडे खुर्द हद्दीतीत हा अपघात झाला. याठिकाणी असलेल्या दोस्ती ढाबा जवळ या दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या. या घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू आहे.

वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास स्वराज जानकर हा बुलेटवरून साताऱ्याहून लोणंदच्या दिशेने जात होता आणि सुप्रीम शिंदे हा त्याच्या दुचाकीवरून साताऱ्याच्या दिशेला जात होता. दरम्यान पिंपोडे खुर्द गावच्या हद्दीतील कोरेगाव फाट्याजवळ या दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली.

दोन्ही दुचाकींचा हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळतात वाठार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय पिंपोडे बुद्रुक येथे पाठवण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

SCROLL FOR NEXT