Sarpanch Mangesh Sabale protests outside the Collector’s office demanding relief for teachers burdened with election duties. saam tv
महाराष्ट्र

शिक्षकांसाठी सरपंच रस्त्यावर, सरपंच थेट कलेक्टरला नडला

SIRच्या कामाला शिक्षकांना जुंपल्याचा परिणाम त्यांच्या शाळेतील कामावर होतोय. शाळेत शिक्षकच नसल्यानं विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होतंय. मात्र, आता एक सरपंच या शिक्षकांसाठी थेट रस्त्यावर उतरलाय. शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी कसा आवाज उठवलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Saam Tv

राज्यातील शिक्षकांवर लादण्यात आलेल्या SIR आणि BLO ड्युटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होतंय. या अतिरिक्त कामाच्या ताणामुळे आणि मनस्तापामुळे शिक्षकांनी थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला. मात्र आता याच शिक्षकांसाठी सरपंच थेट रस्त्यावर उतरलाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच ठिय्या मांडला. जिल्हा परिषद शाळांमधल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्यानं सरपंच साबळे थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच नडले.

मात्र त्यांना पोलिसांनी अटकाव केला. त्यामुळे संतापलेल्या साबळेंनी पोलीस अधिकाऱ्यांनाही चांगलंच धारेवर धरलं....विशेष म्हणजे, शिक्षकांना निवडणुकीची कामे दिली तर विद्यार्थ्यांना शिकवणार कोण?, असा सवाल राज्यातील सर्वच जिल्ह्यांतून विचारला जातोय. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन जाब विचारणाऱ्या सरपंच मंगेश साबळेंची भूमिका लक्षवेधी ठरलीये. हा प्रश्न केवळ शिक्षकांचा नसून तो विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणाच्या हक्काचा आहे. त्यामुळे सरकारनं यावर तोडगा काढण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart blockage symptoms: ही 5 लक्षणं दिसली तर समजा की हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यात; हार्ट अटॅक येण्यापूर्वी लक्ष द्या

Mumbai Tourism : किल्ल्यासारखं दिसणारं गणपतीचं मंदिर, मुंबईजवळच आहे 'हे' खास लोकेशन

EPFO New Rule 2026 : मोठी बातमी! ₹25,000 EPFO मर्यादा लागू; तुमचा पगार कमी होणार?

Cardamom Benefits: पचनक्रिया सुधारण्यापासून तोंडाची दुर्गंधी कमी करण्यापर्यंत; रोज १ वेलची खाण्याचे ७ फायदे

MPSC Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली; आता कधी होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT