स्वातंत्र्यदिनी सरपंच उपसरपंच बसले उपोषणाला... राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

स्वातंत्र्यदिनी सरपंच उपसरपंच बसले उपोषणाला...

अलिबाग तालुक्याच्या खारेपाट ग्रामपंचायतींचे सरपंच आणि उपसरपंच आज स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. ऐन पावसाळ्यात या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : अलिबाग तालुक्याच्या खारेपाट ग्रामपंचायतींचे सरपंच आणि उपसरपंच आज स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. ऐन पावसाळ्यात या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. हा संताप प्रशासनासमोर आणावा यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

हे देखील पहा -

अलिबाग तालुक्यातील रेवस, रांजण खार डावली, बोडणी, मिळखतखार, सारळ या ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी रेवस ग्रामीण पाणी पुरवठा योजना, जलजीवन योजना, भारत निर्माण योजना कार्यन्वित केली आहे. या पाणी योजना गेल्या पंधरा वीस वर्षांपासून सुरू असल्या तरी येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र जैसे थे राहिला आहे. पावसाळ्यात धरणे भरली असतानाही आणि पाणी योजना असून खारेपाट भागातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे.

रांजणखार डावली, मिळकतखार रेवस, सारळ या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यांनीच प्रशासनाविरोधात आंदोलनाचा पावित्रा उचलला आहे. 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरपंच, उपसरपंच आणि महिलांनी आंदोलन केले आहे. आमचा पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशाराही प्रशासनाला आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गॅस सिलिंडरसाठी जास्त पैसे घेतले तर खबरदार! थेट गुन्हा दाखल होणार

Maharashtra Live News Update : गॅस सिलिंडर टंचाई प्रकरणी काँग्रेसचं आंदोलन; शिवसेना आमदार गोगावलेंची टीका

Kuldeep Yadav Wedding: कुलदीप यादवची होणारी बायको कोण? मेहेंदीचे फोटोचे झाले व्हायरल

Hair Care Tips: महिलांनो पार्लरला जाण्याची गरज नाही, घरीच करा केरीटीन ट्रिटमेंट; वाचतील हजारों रुपये

कुणाला किती मिळणार गॅस सिलिंडर? टंचाई होणार दूर,वितरणासाठी राज्य सरकारचा नवा प्लॅन

SCROLL FOR NEXT