Nandurbar News Saam TV
महाराष्ट्र

Nandurbar News: भरधाव कार आणि दुचाकीची जोरदार धडक; थरारक अपघातात २ जण ठार

Sarangkheda Accident: धावत्या दुचाकीवरून हवेत लांबवर ते फेकले गेले आणि धाडकन खाली कोसळले. त्यामुळे दोघांनाही गंभीर दुखापत झाली. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

साम टिव्ही ब्युरो

Nandurbar:

सारंगखेडा ते शहादा रस्त्यावरील सप्तशृंगी पेट्रोल पंपाजवळ कापसाने भरलेले वाहन व मोटरसायकलीचा भीषण अपघात झालाय. अपघात इतका भीषण होता की, या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे.

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी दोन्ही युवक सारंगखेडा येथे मासेमारी करण्यासाठी येत होते. यावेळी समोरून येणाऱ्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक जोरदार बसल्याने यात दोन्ही युवक रस्त्याच्या बाजूला फेकले गेले.

धावत्या दुचाकीवरून हवेत लांबवर ते फेकले गेले आणि धाडकन खाली कोसळले. त्यामुळे दोघांनाही गंभीर दुखापत झाली. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघात होताच स्थानिक नागरिक मदतीला धावून आले.

यावेळी सारंगखेडा येथील सरपंच शेताकडे जात असताना त्यांनी रस्त्यावरील अपघात झाले आहे म्हणून त्यांनी तात्काळ सारंगखेडा पोलीस स्टेशन व सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क केला. या घटनेत कापसाने भरलेली गाडी देखील पलटी झाली. वाहन चालकाला सारंगखेडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अद्याप या घटनेत मृतांची ओळख पटली नसून पोलीस ओळख पटविण्याचे काम करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT