santosh parab 
महाराष्ट्र

कणकवली : नितेश राणेंचा उल्लेख टाळत संताेष परब म्हणाले...!

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.

अनंत पाताडे, अमोल कलये, संभाजी थोरात

सिंधूदूर्ग : माझ्याकडे जबाबदारी हाेती. ती अखेर पर्यंत पार पाडण्यासाठी मी आज मतदानाला आलाे आहे. या बॅंकेवर विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचा पुन्हा एकदा वरचष्मा राहील यात शंका नाही. ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांना शासन व्हावे यासाठी मी गेले दाेन दिवस न्यायालयात देखील उपस्थित हाेताे असे सहकार समृद्धीचे पॅनलचे प्रचार प्रमुख संताेष परब (santosh parab) यांनी नमूद केले. sindhudurg dcc bank election update

सिंधुदुर्ग जिल्हा बँक (dcc bank) निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानास प्रारंभ झाला आहे. महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनल सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली तसेच भाजपचे सिद्धीविनायक पॅनल राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली लढत हाेत आहे. यंदाच्या निवडणुकीत (election) केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे (nitesh rane) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख व विद्यमान चेअरमन सतीश सावंत यांचीही प्रतिष्ठा लागली आहे. या निवडणुकीसाठीच्या मतदानाचा हक्क संताेष परब यांनी बजावला.

यावेळी माध्यमांशी बाेलताना संताेष परब म्हणाले ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांचे नाव आत्ता येथे सांगू शकत नाही. न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान आज दुपारी आमदार नितेश राणे यांच्या अटकपुर्व जामीन अर्जावर निर्णय हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय क्षेत्रातील नजरा काेकणाकडे लागल्या आहेत.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father Died: अभिनेत्री विष्णू प्रियाच्या वडिलांची हत्या; घरात शिरून संपवलं, पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

Paratha Recipe : सकाळी घाई असते? फक्त १० मिनिटांत मुलांसाठी बनवा 'हा' पराठा; नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: दुर्दैवाने अजित पवारांना मुख्यमंत्री होता आलं नाही : फडणवीस

Chennai Golden Beach: महाराष्ट्रातल्या ७ भावी इंजिनिअर्सचा चेन्नईत मृत्यू, सेल्फी घेताना बीचवर नेमकं काय घडलं?

PM Kisan Yojana: पीएम किसानचा २२वा हप्ता कधी येणार? तुमच्या खात्यात ₹२००० जमा होणार की नाही? चेक करा स्टेट्स

SCROLL FOR NEXT