Valmik Karad surrenders News Saam Tv
महाराष्ट्र

Walmik Karad surrenders : वाल्मिक कराडच्या सरेंडरचे नाट्य, स्कॉर्पिओमधून लपून आला अन् पोलिसांनी पकडले, पाहा व्हिडीओ

Valmik Karad surrenders News: संतोष देशमुख याच्या हत्येचा आरोपी वाल्मीक कराड यानं पोलिसांसमोर सरेंडर केलेय. सीआयडकडे तपास गेल्यानंतर संतोष देशमुख प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय.

Namdeo Kumbhar

Santosh Deshmukh Murder suspect Valmik Karad surrenders: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या २१ दिवसानंतर मास्टरमाईंड वाल्मीक कराड पोलिसांना शरण आला. वाल्मीक कराड पोलिसांना शरण येणार ही बातमी समोर आली, त्यावेळी कार्यकर्त्यांनी सीआयडी कार्यलयाबाहेर मोठी गर्दी जमली होती. कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले. बंदोबस्त उठला आणि अचानक पांढऱ्या स्कॉर्पिओमध्ये बसून वाल्मीक कराड सीआयडी ऑफिसमध्ये दाखल झाला.

पोलिसांकडे वाल्मीक कराड हा शरण येणार असल्याबाबतच्या अधिकृत अशी कोणतीही माहिती नसल्याने हळूहळू बंदोबस्त कमी करण्यात आला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या परिसरातून निघून गेले, त्यानंतर वाल्मीक कराड हे आज शरण येण्याची शक्यता कमी असल्याचं वाटत असतानाच एका पांढऱ्या स्कॉर्पिओमध्ये सीआयडी ऑफिसमध्ये दाखल झाला.

वाल्मीक कराड याच्यासोबत परळी येथील दोन नगरसेवक देखील होते. मीडियापासून वाचण्यासाठी वाल्मीक कराड हा मधल्या सीटमध्ये लपून बसले होते, गाडी अत्यंत वेगाने सीआयडी ऑफिसच्या गेट वरती पोहोचली वाल्मिक कराड गेट वरतल आलेला दिसताच गेट वरती असलेल्या दोन पोलिसांनी अचानक त्यांना ताब्यात घेतलं. कार्यालयात नेलं यादरम्यान माध्यमांनी वाल्मीक कराड यांना गेले आठ दिवस तुम्ही कुठे होता? याबाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी हात जोडत प्रश्नांना उत्तर देण्यास नकार दिला.

वाल्मीक कराडची चौकशी सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक प्रशांत बुरडे करत आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणात गुन्हे अन्वेषण विभाग कार्यालयात वाल्मीक कराड याची चौकशी सुरु झाली आहे. वाल्मीक कराडने सरेंडर केल्यानंतर सीआयडी ऑफिसमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैणात करण्यात आलाय. कार्यलायाबाहेर कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

SCROLL FOR NEXT