Walmik Karad News  Saam tv
महाराष्ट्र

Walmik Karad: पुणे, बीड नंतर लातूर, आता महाराष्ट्रातलं नवं शहर कुठलं? वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे आणखी प्रॉपर्टी

Walmik Karad Second Wife Jyoti Jadhav: वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावावर लातूरमध्ये प्रॉपर्टी असल्याची माहिती समोर आली आहे. आधी पुणे, नंतर बीड आणि आता लातूर अशा ३ ठिकाणी ज्योती जाधवच्या नावावर संपत्ती आहे.

Priya More

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा नवा कारनामा बाहेर आला आहे. वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावावर महाराष्ट्रातल्या आणखी एका नव्या शहरामध्ये प्रॉपर्टी असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे, बीडनंतर आता लातूरमध्ये ज्योती जाधवच्या नावावर आणखी बेनामी संपत्ती आहे.

वाल्मिक कराडची लातूरमध्ये देखील बेनामी संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मिकची दुसरी पत्नी ज्योती जाधवनच्या नावे ४ ते पावणे पाच एकर जमीन असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लातूर- टेंभुर्णी महामार्गावर मुरुडच्या जवळ ही जमीन असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या सगळ्या जमिनीची किंमत कोट्यावधीत असल्याची माहिती आहे. सध्या लातूरमध्ये ज्योती जाधवच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावावर सर्वात आधी पुण्यात प्रॉपर्टी असल्याचे समोर आले होते. ज्योती जाधवच्या नावावर पुण्यात तीन फ्लॅट आहे. त्यानंतर नुकताच तिच्या नावावर बीडच्या मांजरसुंबा परिसरात ९ एकर जमीन असल्याचे समोर आले. या परिसरात वाल्मिक कराडने एकूण ५० एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप होत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरुम उपसा करून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून ज्योती जाधववर करण्यात आला आहे.

वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव यांच्या नावावर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉपर्टी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता नवं ठिकाण कोणतं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ज्योती जाधव ही वाल्मिक कराडची दुसरी पत्नी असून त्यांना दोन मुलं आहेत. दरम्यान, तुरूंगात असलेल्या वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे पुन्हा हादरले, ४ मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न; सोसायटीचा वॉचमेन पोलिसांच्या ताब्यात

पुण्याला मिळणार आणखी एक महामार्ग, राज्य सरकारने १२०० कोटींच्या प्रकल्पाला दिली मंजुरी, कुठून जाणार हायवे?

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट

Khana Saree Dress: खणाच्या साडीपासून शिवा हे ७ ट्रेंडी ड्रेस उन्हाळ्यात लग्नसराई किंवा कार्यक्रमांसाठी आहे बेस्ट चॉईस

Monsoon Update : आनंदवार्ता! 'या' तारखेला मान्सून केरळमध्ये होणार दाखल; जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT