Walmik Karad News SaamTv
महाराष्ट्र

Walmik Karad: सर्दी, खोकला अन् ताप; तुरूंगात वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली

Santosh Deshmukh Case Update: संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणी तुरूंगात असलेल्या वाल्मिक कराडच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाला आहे. वैद्यकिय तपासणीतून ही माहिती समोर आली आहे.

Priya More

विनोद जिरे, बीड

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडबाबत मोठी बातमी समोर आली आहे. तुरुंगामध्ये असलेल्या वाल्मिक कराडच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाला आहे. वाल्मिक कराडला सर्दी, खोकला आणि ताप आला आहे. वैद्यकीय तपासणीतून ही माहिती समोर आली आहे. बीड शहर पोलिस ठाण्यात वाल्मिक कराडची वैद्यकीय तपासणी पूर्ण करण्यात आली.

खंडणी प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. वाल्मीक कराडची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी होणार आहे. कोर्टाने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी करण्यास परवानगी दिली. आज दुपारी बीड जिल्हा न्यायालयामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी होणार आहे. वाल्मिक कराडला न्यायालयामध्ये हजर केले होते तेव्हा गोंधळ उडाला होता. त्यामुळे पोलिस प्रशासनाने न्यायालयाकडे अर्ज करून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेण्यास परवानगी दिली.

वाल्मिक कराडला बीड जिल्हा न्यायालयामध्ये हजर केले जाणार असल्यामुळे न्यायालयाच्या आवारात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाल्मिक कराडला न्यायालयात हजर केलेल्या दिवशी मोठा गोंधळ झाला होता. यामुळं पुन्हा असा प्रकार घडू नये आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या आवारामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आजच्या सुनावणीच्या दिवशी न्यायालय नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT