Walmik Karad News SaamTv
महाराष्ट्र

Walmik Karad: वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, बीड जिल्हा रुग्णालयातील ICU मध्ये उपचार सुरू

Walmik Karad Health Update: वाल्मिक कराडला पोटदुखीचा त्रास होत असून त्याच्यावर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

Priya More

विनोद जिरे, बीड

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. तुरुंगामध्ये असलेल्या वाल्मिक कराडच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाला आहे. वाल्मिक कराडला पोटदुखीचा त्रास होत असून त्याच्यावर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

बुधवारी देखील वाल्मिक कराडची प्रकृती खराब झाली होती त्याला सर्दी, खोकला आणि ताप आला होता. वैद्यकीय तपासणीतून ही माहिती समोर आली होता. आता त्याा पोटदुखीचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिक कराडची प्रकृती अचानक बिघडली. पोटात दुखू लागल्याने वाल्मिक कराडला उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात रात्री एक वाजता आणण्यात आले होते. यावेळी त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती नाजूक असल्याने त्याच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. सध्या बीड जिल्हा रुग्णालय परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

वाल्मीक कराड याच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर आज केज न्यायालयात सुनावणी होणार आहे. खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराडने खंडणी प्रकरणात जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. सकाळी ११ वाजता ही सुनावणी होणार असून याआधी कराडच्या वकिलाची प्रकृती खराब असल्याने आणि त्यानंतर विनंतीनुसार ही सुनावणी दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती.

मात्र आज ही सुनावणी केज न्यायालयात होणार आहे. या आधीच या जामीन अर्जावर आक्षेप घेत सीआयडीने कराडला जामीन देऊ नका, असा अर्ज देखील न्यायालयात केला होता. आता यावर आज कोर्टात काय युक्तिवाद केला जातो? आणि जामीन अर्जावर न्यायालय काय निर्णय देते ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इस्त्रायल-अमेरिकेच्या निशाण्यावर अयातुल्ला अली खामेनेई; आधी धमकी आता थेट घरावर हल्ला

Maharashtra Live News Update: खारघरमध्ये ‘हिंद की चादर’ कार्यक्रमात बॅनर कोसळला; महिलेला किरकोळ दुखापत

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या अपघाती निधनाला महिना पूर्ण; 30 दिवसात बदललं राज्याचं राजकारण

Pune Crime: तरुणी लिफ्टने आठव्या मजल्यावर आली अन्...; आत्महत्येच्या घटनेनं वाघोली हादरली

Ajit Pawar Plane Crash: ट्रेनी विद्यार्थी चालवत होते 'एटीसी टॉवर'; अहवालातून बारामती विमानतळाबाबत धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT