Dhananjay Deshmukh Visit To Bhagwangad Saam Tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh: धनंजय देशमुख पुराव्यांसह भगवानगडावर जाणार; धर्मशास्त्री देशमुखांना न्याय देणार?

Dhananjay Deshmukh Visit To Bhagwangad : संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी शास्त्रींच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केलाय. धनंजय देशमुख नामदेव शास्त्रींना आरोपींविरोधातील पुरावे देणार.

Bharat Mohalkar

भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींना सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख गडावर जाऊन पुरावे देणार आहेत? हे पुरावे नेमके काय आहेत? पुरावे दिल्यानंतर शास्त्री देशमुखांना न्याय देणार का? यावरचा हा विशेष रिपोर्ट. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींनी सरपंच हत्या प्रकरणी क्लीन चीट तर दिलीच पण गुन्हेगारांची मानसिकता समजून घेण्याचा सल्ला देत एकप्रकारे त्यांचंही समर्थनच केलंय.

सरपंच हत्या प्रकरणाशी संबंधित वाल्मिक कराडसह 9 आरोपींवर मकोका लावण्यात आलाय.. त्यातच आरोपींचे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्याशी संबंध असल्याचा आरोप सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून केला जातोय.. तर धनंजय देशमुखही सरपंच हत्या प्रकरणातील महत्वाचे पुरावे महंत नामदेव शास्त्रींना देणार आहेत. या पुराव्यात नेमकं काय आहे? पाहूयात..

देशमुख शास्त्रींना कोणते पुरावे देणार?

आवादा कंपनीच्या दलित सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याचे सीसीटीव्ही

हत्या केलेल्या आरोपींच्या गुन्ह्याचा सातबारा

वाल्मिक कराड आणि हत्येतील आरोपींचे लागेबांधे

धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडमध्ये असलेल्या आर्थिक व्यवहाराचे पुरावे

धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असलेल्या कराडवर मकोका लावण्यात आल्यानंतर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. मात्र त्यानंतरही आधी अजित पवारांनी मुंडेंना अभय दिलंय.. तर भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींनी मुंडेंना क्लिन चीट दिलीय. त्यामुळे मुंडेंची पाठराखण करणारे धर्मशास्त्री धनंजय देशमुखांनी पुराव्यानंतर तरी देशमुखांना न्याय देणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT