Santosh Deshmukh Case  Saam Tv
महाराष्ट्र

संतोष देशमुख हत्या प्रकरण : राज्य सरकारने उचललं मोठं पाऊल, कारवाईला वेग येणार

बीड - संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मस्साजोग प्रकरण विरोधकांनी लावून धरत सरकारला धारेवर धरले.

Namdeo Kumbhar

Santosh Deshmukh Case : बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता विशेष वकिलाची नियुक्ती करण्यात आली आहे. बाळासाहेब कोल्हे असं नियुक्ती करण्यात आलेल्या सरकारी वकिलांचे नाव आहे. ‘विशेष लोक अभीयोजक” म्हणून कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अॅडव्होकेट कोल्हे यांची फी गृह विभाग देणार आहे.

बाळासाहेब कोल्हे याना फौजदारी प्रकरणातील अनुभव, माहिती व अभ्यास असल्याने त्यांनी बऱ्याच आरोपींना शिक्षेस पात्र होईल, असे प्रकरणे निकाली लावले आहेत. त्यामुळे त्यांना विशेष जबाबदारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. असा आदेश अनुभाग अधिकारी, विधी एव न्यायपालिका विभाग प्रमुख वैशाली बोरुडे यांनी काढला आहे.

सूत्रे हातात घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक अॅक्शनमोडमध्ये -

बीड - पोलीस अधीक्षक पदाचा पदभार घेताच नवनीत कॉवत मस्साजोग प्रकरणात सर्व अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. पोलीस तुमच्यासाठी आहे.. निसंकोच पणे तुम्ही कोणताही माहिती माझ्यापर्यंत पोहोचू शकता, असे आवाहन त्यांनी केलेय.

बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार घेताच नवनीत कॉवत यांनी मस्साजोग प्रकरणात सर्व अधिकाऱ्याची बैठक बोलावली. तपास कुठपर्यंत गेलेला आहे ? तपासामध्ये काय काय बाकी आहे ? आरोपी अटक करण्याचे जे बाकी आहेत, त्यांना अटक करण्यासाठी आम्ही प्रधान्याने काम करणार आहे.. असं पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी सांगितलं. पदभार घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला..

दरम्यान, शासनाने माझ्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे, बीडच्या लोकांनाही माझ्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. बीड जिल्ह्यातील लोकांना जो जिल्ह्यामध्ये प्रॉब्लेम आहे, तो सोडवण्याचा प्रयत्न मी 100% करेल. तुमच्याकडून मला सहकार्य पाहिजे.. पोलीस प्रशासन तुमच्यासाठी आहे.. असेही आवाहन नवनीत कॉवत यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाला मिळणार? पक्ष बैठकीत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Sleeping With Earplugs: रोज रात्री इअरप्लग लावून झोपता? आजपासूनच सोडा ही सवय नाहीतर होऊ शकतात हे गंभीर आजार

भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा कुरकुरीत 'भेंडीची भजी'

Commonwealth Games 2026 : भारताच्या लेकींचा गोल्डन पंच; बॉक्सिंगमध्ये प्रीती पवार, जॅस्मिननं जिंकली सुवर्णपदके

Inflation Alert: सणासुदीपूर्वी सर्वसामान्यांना झटका! डिटर्जंटपासून पेंटपर्यंत 'या' वस्तू होणार महाग

SCROLL FOR NEXT