Anjali Damania On Dhananjay Munde Resignation  Saam Tv
महाराष्ट्र

Dhananjay Munde: मला देवेद्र फडणवीस म्हणाले, मी मुंडेंचा राजीनामा घेऊ शकत नाही; अंजली दमानिया यांचा दावा

Anjali Damania On Dhananjay Munde Resignation : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी साम टीव्हीच्या 'ब्लॅक अँण्ड व्हाइट' कार्यक्रमात बीडमधील हत्या प्रकरण आणि धनंजय मुंडे, वाल्मिक कराडविषयी अनेक खुलासे केले आहेत.

Bharat Jadhav

सरपंच देशमुख हत्याप्रकरणात जर मी मुख्यमंत्र्यांना दोषी वाटत असेल तर त्यांनी माझा राजीनामा घ्यावा, असं धनंजय मुंडे म्हणालेत. सरपंच हत्या प्रकरणतील आरोपी वाल्मिक कराडशी धनंजय मुंडे यांचे संबंध आहेत. त्यामुळे या हत्याप्रकरणावरून मुंडेंवर आरोप केलं जात आहे. त्यांचा राजीनामा मागितला जात आहे. यावरून बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, नैतिकतेतून मी दोषी नाहीये, पण मुख्यमंत्र्यांना मी दोषी वाटत असेल तर त्यांनी राजीनामा मागावा, असं विधान केलं.

मात्र यावर मुख्यमंत्र्यांची वेगळीच भूमिका आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. धनंजय मुंडे हे दुसऱ्या पक्षाचे आहेत, त्यामुळे त्यांचा राजीनामा मी घेऊ शकत नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलाय.

अंजली दमानिया, साम टीव्हीच्या ब्लॅक अँण्ड व्हाइट या कार्यक्रमात बोलत होत्या. बीडमधील मस्साजोग येथील सरपंच हत्याप्रकरणाने राज्याला हादरलं होतं. याप्रकरणावरून अंजली दमानिया यांनी सरकारला सळो की पळो करून सोडलंय. सरपंच हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. धनंजय मुंडे यांचा संबंध सरपंच हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्याशी आहे. त्यामुळे नैतिकदृष्ट्या धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जातेय. भाजप नेते सुरेश धस आणि अंजली दमानिया यांनी राजीनाम्याची मागणी केलीय.

दमानिया यांनी बीड सरपंच हत्या प्रकरण लावून धरलंय, यामुळे धनंजय मुंडे हे अडचणीत आले आहेत. याप्रकरणी अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली. रामटेक बंगल्यावर दमानिया यांनी त्यांची भेट घेत कराड आणि धनंजय मुंडे यांच्या प्रकरणी पुरावे दाखवले. त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत.

त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, जर मुख्यमंत्र्यांनी माझा राजीनामा मागितला तर आपण राजीनामा देऊ. यावर दामानिया यांनी साम टीव्हीच्या ब्लॅक अँण्ड व्हाईट कार्यक्रमात मोठं भाष्य केलंय. वाल्मिक कराडशी धनंजय मुंडेशी संबंध आहेत. त्याप्रकरणाचे पुरावे आपल्याकडे आहेत. हे पुरावे आपण मुख्यमंत्र्यांना दाखवले. धनंजय मुंडे यांनी पद सोडलं पाहिजे, अशी मागणी केली. परंतु धनंजय मुंडे हे आपल्या पक्षाचे नेते नाहीत. ते दुसऱ्या पक्षाचे आहेत, त्यामुळे मी त्यांचा राजीनामा घेऊ शकत नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, असल्याचा दावा दमानिया यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT