Sant Nivruttinath Palkhi 2024 Saam Tv
महाराष्ट्र

Sant Nivruttinath Palkhi 2024 : कपाळी टिळा, गळ्यात तुळशीची माळ, त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याच्या यात्रेला सुरुवात

Sant Nivruttinath Maharaj : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ अनेकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. आज षट्तिला एकादशीच्या शुभ मुहूर्तावर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रेला सुरुवात झाली आहे.

कोमल दामुद्रे

तबरेज शेख, प्रतिनिधी

Sant Nivruttinath Maharaj Yatra 2024 :

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ अनेकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. आज षट्तिला एकादशीच्या शुभ मुहूर्तावर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रेला सुरुवात झाली आहे.

लाखो वारकऱ्यांच्या गर्दीने त्र्यंबकनगरी दुमदमून गेली आहे. कपाळावर टिळा, गळ्यात तुळशीची माळ आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेत महाराष्ट्रभरातून वारकरी त्र्यंबकेश्वरमध्ये (trimbakeshwar) दाखल झाले असून टाळ मृदूंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने इथले वातावरण भक्तीमय झाले आहे.

तीनशेहून अधिक दिंड्या दाखल झाल्या असून भाविकांनी दर्शनासाठी निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरासमोर रांगा लावल्या आहेत. दरम्यान या सोहळ्याचे नियोजन करतांना प्रशासनाने 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची रंगीत तालीम म्हणून याकडे पाहावे, वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्याने प्रशासन तसेच मंदिर (Temple) संस्थांकडून सर्व खबरदारी घेतली जाते आहे.

पालकमंत्री दादा भूसे यांनी आज सकाळी विधिवत पूजा केली असून सर्वांना सुखी ठेव अशीच प्रार्थना त्यांनी नाथांकडे केली आहे. या यात्रेनिमित्त त्र्यंबक नगरपरिषदेकडून यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना दिवाबत्ती, स्वच्छता, टॉयलेट सुविधांसह आरोग्याच्या सेवा पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

याशिवाय भाविकांसाठी विविध ठिकाणी पाण्याच्या टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर येथील यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असल्याने वारकऱ्यांची मोठी गर्दी होते. या गर्दीचा फायदा घेत काही चोरटे संधी साधण्याची शक्यता असते. त्यामुळे सीसीटीव्हींची देखील नजर राहाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जात पात पाहून मी कधी राजकारण केलं नाही - धनंजय मुंडे

Dry Lips Care: तुमचेही ओठ खूपच कोरडे होतायेत? या सोप्या टिप्स करा फॉलो

Budh Gochar 2025: डिसेंबर महिन्यात २ वेळा गोचर करणार राजकुमार बुध; 'या' ३ राशींच्या व्यक्ती होणार करोडपती

Lehenga Selection: लग्नसराईसाठी लेहेंगा खरेदी करायचा आहे? मग शॉपिंगला गेल्यावर 'या' गोष्टींची घ्या काळजी

Aadhaar Card Update: आधार कार्ड अपडेटच्या नियमांत बदल; सर्व कामे होणार ऑनलाइन; स्टेप बाय स्टेप प्रोसेस वाचा

SCROLL FOR NEXT