संजय राऊत पत्रकार परिषेदत कुठल्या विषयावर बोलणार, नाना पटोलेंनी दिले संकेत Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Raut : संजय राऊत पत्रकार परिषेदत कुठल्या विषयावर बोलणार, नाना पटोलेंनी दिले संकेत

शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी शिवसेना भवनामध्ये आपण महत्वाची पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा काल केली होती.

गजानन भोयर, साम टीव्ही वाशिम

वाशिम : आज शिवसेना खासदर संजय राऊत (Sanjay Raut) आज चार वाजता पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या नेत्याचे भ्रष्ट्राचार समोर आणणार आहेत. त्यामुळं आज केंद्र सरकारने मुंबईत ईडीच्या चौकशा सुरू केल्या असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वाशिमधे बोलताना केलं.

दाऊदचा भाऊ इकबाल कासरकर यांच्या संदर्भात विचारले असता देशात पाच राज्यात निवडणुका सुरू आहेत. त्यामुळं केंद्र सरकार विरोधक कसा चुकीचा प्रयत्न करीत दाखविण्यासाठी हे सत्र सुरू असल्याचही पटोले (Nana Patole) बोलत होते. आज ते वाशिम मध्ये पोहरादेवी येथे आले असता बोलत होते.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी शिवसेना भवनामध्ये आपण महत्वाची महत्वाची पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा काल केली होती आणि त्यामुळेच राऊत काय बोलणार याची सर्वच राजकीय नेते मंडळींसह राज्यातील शिवसैनिक आणि सामान्य जनतेलाही उत्सुकता लागली आहे. तसच आता पटोले यांच्या वक्तव्यावरुन राऊत हे भाजपच्या (BJP) नेत्यांना टार्गेट करत त्यांच्यावरती भष्ट्राचाराचे आरोप करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी

Shocking: भुकेनं व्याकुळ मुलानं दूध मागितलं, संतापलेल्या बापानं ४ वर्षाच्या पोराला दरवाजावर आपटलं

राज्यातील 80 लाख महिला अपात्र! ₹1500 सरकारच्या डोळ्यात खुपताय का?

पोटावरची चरबी झटक्यात उतरेल! सकाळी दुधासोबत प्या 'या' हिरव्या पानांची पावडर

Satbara Utara : कामाची बातमी! ५ मिनिटात घरबसल्या काढा सातबारा, फक्त ₹१५ होणार खर्च; पाहा 7/12 ऑनलाइन काढण्याची सोपी प्रोसेस

SCROLL FOR NEXT