Sanjay Raut Saam
महाराष्ट्र

Sanjay Raut: 'टेंभी नाक्यावर डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा बसवा अन् गावागावात यात्रा काढा', महायुती सरकारवर राऊत बरसले

Sanjay Raut Slams Mahayuti Govt: युद्धबंदीच्या निर्णयावर खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करत खोचक टोला लगावला आहे.

Bhagyashree Kamble

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने बिथरून भारत आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला चढवला. त्यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करत युद्धबंदीची घोषणा केली. व्हाईट हाऊसमधून झालेल्या घोषणेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी महायुती सरकारवर टीकेची तोफ डागली. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील सरकारवर निशाणा साधला. महायुतीने डोनाल्ड यात्रा काढावी, असा खोचक सल्ला त्यांनी दिला.

डोनाल्ड यात्रा काढा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यावर निशाणा साधत संजय राऊत म्हणाले,

"तिरंगा यात्रा काढली जातेय, पण यामागे नेमकं कारण काय? विजय कसला? माघार घेण्याचा? शस्त्रसंधीचं? युद्धविरामाचं? हे विजय मानून जर उत्सव साजरा होणार असेल, तर मग त्याचं श्रेयही ट्रम्पलाच दिलं पाहिजे. त्यामुळे गावागावात ‘डोनाल्ड यात्रा’ काढा, ‘डोनाल्ड जत्रा’ भरवा आणि ट्रम्प यांचा पुतळा उभा करा. त्यावर अमेरिकेचा झेंडा फडकवा आणि म्हणा, आमचं कुलदैवत डोनाल्ड आहे", असा खोचक सल्ला त्यांनी दिला.

डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा उभा करा

तसेच 'टेंभी नाक्यावर डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा उभा करा आणि त्यावर अमेरिकेचा झेंडा फडकवा. कारण, तुम्हाला युद्धबंदीचं विजय ट्रम्पमुळेच मिळालंय ना', अशी टीका संजय राऊत यांनी केली.

एकनाथ शिंदेंवर घणाघात

एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र डागत राऊत म्हणाले,'आज इतकं सोपं झालंय का की आमदार-खासदार विकत घ्या, आणि सरकार बनवा? निवडणूक आयोगाच्या बोटाला धरून पक्ष ताब्यात घेणं इतकं सोपं नाही', असा घणाघात संजय राऊतांनी केला.

पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी राजीनामा द्यावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, 'बलुचिस्तान स्वतंत्र व्हावं म्हणून भारताने मदत करावी, अशी गरज होती. पण तेवढंही केलं नाही. मिस्टर मोदी आणि अमित शहा, तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल, आणि तो दिवस लवकरच येईल', असा दावा संजय राऊत यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Fine : वाहतूक नियम मोडणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; थकीत ई-चलन वीज बिलातून वसुल होणार

Maharashtra News Live Update: २ तारखेच्या सीजेपीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा- उद्धव ठाकरे

Raj thackeray: ठाकरे बंधूंचा एल्गार! ४ ऑक्टोबरचा संयुक्त मोर्चा कुठून कुठपर्यंत निघणार? राज ठाकरेंनी सर्वकाही सांगितलं

Sarkari Yojana: ट्रॅक्टर घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून मिळू शकते 50% पर्यंत मदत

Eco-Friendly Nirmalya Collection: गणेशभक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड; गिरगाव चौपाटीवर श्रीसदस्यांकडून निर्माल्य संकलन

SCROLL FOR NEXT