Sanjay Raut- Mohan Bhagwat Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut: 'सुपरमॅनची बहुमताची सतरंजी 'कॉमनमॅनने' खेचली', मोहन भागवतांच्या विधानावरुन राऊतांचा भाजपला टोला!

Sanjay Raut News: एक व्यक्ती आहे या देशात जी सांगते रशिया आणि युक्रेंचा युद्ध मिस थांबवला पण ती व्यक्ती मणिपूर आणि जम्मू-काश्मीरमधील हिंसाचार थांबू शकत नाही," असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

Gangappa Pujari

मयुर राणे, ता. १९ जुलै २०२४

झारखंडमधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी “काही लोक आधी सुपरमॅन (महापुरुष), त्यानंतर पूजनीय आणि पूजनीय नंतर देव बनू पाहत आहेत”, असे मोठे विधान केले. मोहन भागवत यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. यावरुनच संजय राऊत यांनी थेट भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"एक व्यक्ती या देशात स्वतःला विष्णूचा तेरावा अवतार समजते. जिला असं वाटतं प्रभू श्रीराम यांचे बोट धरून मीच त्यांना अयोध्येच्या राम मंदिरात घेऊन गेलो. ते नसते तर अयोध्येत राम भगवान राम यांची प्राणप्रतिष्ठा झाली नसती. एक व्यक्ती आहे, जी या देशात ती स्वतःला सुपरमॅन समजते एक व्यक्ती आहे. एक व्यक्ती आहे या देशात जी सांगते रशिया आणि युक्रेंचा युद्ध मिस थांबवला पण ती व्यक्ती मणिपूर आणि जम्मू-काश्मीरमधील हिंसाचार थांबू शकत नाही," असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

भाजपने चिंतन करावं..

तसेच "मला असं वाटतं त्याच व्यक्ती विषयी मोहन भागवत बोलले आहेत. काही व्यक्ती स्वतःला सुपरमॅन समजतात. पण सुपरमॅनच्या पायाखालची सतरंजी बहुमताची या सामान्य माणसाने खेचून घेतली तो कॉमनमॅन आज सुपरमॅन आहे असं आम्ही मानतो. मोहन भागवत यांनी मत व्यक्त केलं आहे त्याच्यावर देशाने भारतीय जनता पक्षाने चिंतन केलं पाहिजे," असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सूत्र हातात घेतल्यापासून अपघातांची मालिका सुरूच आहे आणि आतापर्यंत सव्वा तीनशे प्रवासी अपघातात मरण पावले, हा आकडा अत्यंत गंभीर आहे. बुलेट ट्रेन आणत आहात, मेट्रो ट्रेन आणत आहात, सुपरफास्ट ट्रेन आणत आहात, पण सामान्य जनता ज्या लोकल ट्रेनमधून किंवा पॅसेंज मधून प्रवास करते सिग्नर यंत्रणा जे रूळ या संदर्भात सरकार काही करायला तयार नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT