Sanjay Raut on Narendra Modi Saam Tv News
महाराष्ट्र

७५ वर्ष पूर्ण, आता मोदी रिटायर होत आहेत? एनडीएकडून मोदींचा सत्कार का झाला? बड्या खासदारानं सांगितलं..

NDA Felicitates Narendra Modi: एनडीए बैठकीत मोदींचा सत्कार झाल्यानंतर संजय राऊत यांचा खोचक सवाल. "७५ व्या वर्षी मोदी रिटायर होत आहेत का?" - संजय राऊत.

Bhagyashree Kamble

  • एनडीए बैठकीत मोदींचा सत्कार झाल्यानंतर संजय राऊत यांचा खोचक सवाल

  • "७५ व्या वर्षी मोदी रिटायर होत आहेत का?" - संजय राऊत

  • "पीओके घेतलं असतं तर आम्हीच त्यांचा सत्कार केला असता" – राऊत यांची टीका

दिल्ली येथे एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात आला. ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव या दोन्ही मोहिमांना मिळालेल्या यशानंतर त्यांचा सत्कार झाला. मोदींच्या झालेल्या सत्कार कार्यक्रमावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. 'सप्टेंबर महिन्यात ७५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर मोदी रिटायर होत आहेत का?', असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी विविध विषयावर भाष्य केलं. 'लाहोर, बलुचिस्तान.... आता पीओके घेणार असं पंतप्रधान म्हणाले होते. जर त्यांनी पीओके घेतला असता तर, आम्हीच त्यांचा सत्कार केला असता', असं म्हणत संजय राऊत यांनी चिमटा काढला.

'दिल्लीमध्ये ७ तारखेला राहुल गांधींनी त्यांच्या निवासस्थानी यूपीए, इंडिया ब्लॉकची बैठक बोलावली आहे. या बैठकीला प्रमुख नेते उपस्थित असतील. आमच्या बैठकीमुळे त्यांच्या (नरेंद्र मोदी) यांच्या मनामध्ये भय निर्माणझालं आहे. त्यामुळे त्यांनी एनडीएची बैठक बोलावली. त्यांचा हा जुना कार्यक्रम. यामुळे आमच्या बैठकीवर कोणताही परिणाम होणार नाही', असं राऊत म्हणाले.

'एनडीएच्या आजच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचा सत्कार झाला. तो कशाकरीता झाला? सप्टेंबरमध्ये ७५वर्षे पूर्ण झाल्यावर नरेंद्र मोदी रिटायर होत आहेत का? आणखी कशाकरीता एनडीए लोकं त्यांचा सत्कार करणार आहेत? नक्की कारण काय?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आम्हीच त्यांचा सत्कार केला असता..पण

'खरंतर ऑपरेशन सिंदूर त्यावेळेस थांबवलं नसतं. मोदींनी वचन दिल्याप्रमाणे पीओके ताब्यात आलं असतं, तर नक्कीच आम्ही सगळ्यांनी मिळून नरेंद्र मोदींचा सत्कार केला असता', असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला. 'पंतप्रधानांनी जे सांगितलं ते करून दाखवलं आहे. आता पिओके घेणार असं राजनाथ सिंग, अमित शहा आणि नरेंद्र मोदी म्हणाले होते. पण तसं घडलं नाही. त्यांचा सत्कार करण्यासाठी आम्हाला संधी मिळालीच नाही. याबद्दल आम्हाला दु:ख आहे', अशी खोचक टीकाही यावेळी त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवनियुक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते निलेश निकम सुनेत्रा पवार यांच्या भेटीला

Budget 2026 Live Updates: १ एप्रिलपासून नवीन आयकर कायदा लागू होणार- निर्मला सितारामन

Maharashtra Politics: खरंच NCP च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती झाली का?, सुनील तटकरेंनी स्पष्ट सांगितलं...

New Income Tax Act: अर्थसंकल्पात करदात्यांसाठी मोठी घोषणा! नवीन आयकर कायदा १ एप्रिलपासून लागू

College Building Collapse : रयत शिक्षण संस्थेच्या कॉलेजच्या इमारतीचा स्लॅब कोसळला, ९ जखमी, १ गंभीर

SCROLL FOR NEXT