Sanjay Raut on Thackeray yandex
महाराष्ट्र

Sanjay Raut: राज - उद्धव एकत्र येणार? संजय राऊत यांनी एका झटक्यात विषय संपवला

Sanjay Raut on Uddhav and Raj Thackeray: ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही? या प्रश्नावर खासदार संजय राऊत यांनी सविस्तर उत्तर दिलंय. काही गोष्टींमुळे ते एकत्र येणं कठीण आहे. पण तरीही..

Bhagyashree Kamble

विधानसभा निवडणुकात दोन्ही भावांना धक्का बसला. यानंतर दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी इच्छा लोकांनी व्यक्त केली. २२ डिसेंबरला कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त ठाकरे बंधू एकत्र दिसले. या भेटीतून त्यांच्यातील दुरावा कमी होणार का? ठाकरे बंधू युती करणार का? अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही? या प्रश्नावर खासदार संजय राऊत यांनी सविस्तर उत्तर दिलंय.

दादरच्या शिवाजी विद्यालयात राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाचा लग्नसोहळा होता. भाच्याच्या लग्नाला दोन्ही मामा एकत्र आले. त्यांनी एकत्र शुभेच्छा दिल्या. तसंच ठाकरे बंधु एकत्र चर्चा करताना दिसले. अशातच ठाकरे बंधुंचं राजकीय मनोमिलन होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याविषयी संजय राऊत यांनी थेट उत्तर दिलं आहे. २२ डिसेंबरला झालेली ठाकरे बंधुंची झालेली भेट राजकीय नसल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

'महाराष्ट्राचं ठाकरे कुटुंबावर जीवापाड प्रेम आहे. ते एकत्र आले, याचा नक्कीच आनंद आहे. पण काही गोष्टींमुळे ते एकत्र येणं कठीण आहे. दोघांचे पक्ष वेगवेगळे आहेत. राज ठाकरे भाजपसोबत राहून काम करतात. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा हे त्यांचे आयडॉल आहेत. पण आमचं तसं नाही, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. त्यांच्याबरोबर आम्हाला काम करता येणार नाही'. असं संजय राऊत म्हणाले.

'कुटुंब एक असलं तरी, वैचारिक मतभेद आहेत. असं म्हणत संजय राऊत यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता धूसर असल्याचं संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत. तरीही एकत्र यायचं की नाही? हा निर्णय दोघा भावांना घ्यायचा आहे. असं मत संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मांडलं. त्यांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्र मान्य करेल' असंही संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: आजच्या युवकांनी विचार करण्याची गरज आहे- अजित डोवाल

Pune Politics: ठाकरेसेनेच्या शहरप्रमुखांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं कारण काय?; वसंत मोरेंनी VIDEO केला पोस्ट

Cyber Crime : मुंबईत 'म्युल अकाउंट' रॅकेटचा पर्दाफाश; ७ जण अटकेत, १० लाखांची रोकड जप्त

Salman Khan: 'माझा मोठा भाऊ...'; संजू बाबासाठी रात्री १.४० वाजता सलमान खानने केली प्रेमळ भावूक पोस्ट

Pune : पुण्यात पावसाचा जोर ओसरला, पाणीपुरवठा करणारी ४ धरणे भरली, किती टक्के आहे साठा? वाचा

SCROLL FOR NEXT