Sharad Pawar and Ajit Pawar Alliance  Saam Tv News
महाराष्ट्र

पवार काका-पुतण्या एकत्र येणार? NCPचं मिलन, कुणाचा अडथळा? राऊतांनी घेतली दोन नेत्यांची नावे

Sharad Pawar and Ajit Pawar Alliance : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेनं पुन्हा जोर धरलाय. मात्र राष्ट्रवादी एकत्र येण्याला खुद्द प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचा विरोध असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय.

Bharat Mohalkar

भरत मोहोळकर, साम टिव्ही

मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेमध्ये आता नवा ट्विस्ट आलाय. संजय राऊतांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यात दादांच्या पक्षाच्या दोन नेत्यांचा अडथळा असल्याचं म्हटलंय. मात्र हे दोन नेते कोण? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेनं पुन्हा जोर धरलाय. मात्र राष्ट्रवादी एकत्र येण्याला खुद्द प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचा विरोध असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडालीय. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी हा दावा खोडून काढलाय.

विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. एवढंच नाही तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयी सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी निर्णय घ्यावा, असे संकेतच पवारांनी दिले होते. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनीही पवारांचं कौतूक केलं. त्यामुळे या चर्चांना आणखीच हवा मिळाली. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना मंत्रिपद गमावण्याची भीती आहे. मात्र संजय राऊतांनी नेमकं हेच हेरुन हा खळबळजनक दावा केलाय. मात्र खरंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही? हे मात्र आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Honeymoon Destinations: डिसेंबरमध्ये हनिमूनचा प्लॅन करताय? ५ ड्रीम डेस्टिनेशन्स समोर परदेशही वाटेल फिका

IPS Officer Transfer: मोठा प्रशासकीय फेरबदल! ३ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

October Heat : ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा तडाखा! आताच जाणून घ्या स्किन केअरच्या ५ स्मार्ट ट्रिक्स

Aishwarya Rai: पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या रायचा ग्लॅमरस लूक; डोक्यावर क्राऊन अन् ब्लॅक वेलवेट गाऊनने वेधलं लक्ष

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

SCROLL FOR NEXT