SANJAY RAUT EXIT POLL: RAHUL GANDHI 58%, MODI 11%; BJPला धक्का? saam tv
महाराष्ट्र

राऊतांचा EXIT POLL, भाजपला धक्का, अच्छे दिन येणार, मोदी-शाह जाणार

Sanjay Raut Exit Poll: आता बातमी आहे राऊतांच्या EXIT POLLची. हा EXIT POLL भाजपसाठी धक्कादायक आहे. नेमकं काय आहे या पोलमध्ये? कुणाचे अच्छे दिन येणार? आणि कोण जाणार? पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक पसंती कुणाला मिळालीय? पाहूयात यावरचा हा विशेष रिपोर्ट.....

Suprim Maskar

निवडणुका आल्या की EXIT POLL आणि वेगवेगळ्या सर्व्हेची नेहमीच चर्चा सुरु होते...मात्र ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलेल्या एका ट्विटमुळे देशाच्या पंतप्रधानपदासाठीच्या पसंतीचा नवा एक्झिट पोल समोर आलाय...या एक्झिट पोलनं भाजपला धक्का दिलाय...एक्झिट पोलमध्ये नेमकं काय आहे...पाहूयात..

'पोल ट्रॅकर'नं देशभरात 'मूड ऑफ इंडिया' या नावाने एक सर्वेक्षण केलं...या सर्वेक्षणात लोकसभेच्या 543 मतदारसंघामधून 4 लाख 53 हजार लोकांची मतं जाणून घेण्य़ात आली...त्यात आज निवडणुका झाल्या तर इंडिया आघाडीला 44 टक्के म्हणजे 280 जागा आणि भाजपप्रणित एनडीएला 40 टक्के म्हणजे 240 जागा मिळू शकतील असा दावा करण्यात आलाय..तसचं पंतप्रधान म्हणून राहुल गांधींच्या नावाला 58 टक्के लोकांनी तर नरेंद्र मोदींच्या नावाला 11 टक्के लोकांची पसंती या सर्वेक्षणात दाखवण्यात आलीय...राम मंदिरातील दानचोरी प्रकऱण, जेन झी आंदोलनामुळे सर्वेक्षणात NDAला फटका बसल्याचं निरीक्षणही नोंदवण्यात आलयं...

याचं सर्वेक्षणासंदर्भात बोलताना राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर टीका केलीय... राऊत नेमकं काय म्हणाले ऐका...'अच्छे दिन' येणार, जुने चांगले दिवस परत येणार, मोदी-शाह जाणार, नक्की जाणार.

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास असल्याचं सांगत भाजपनं राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलयं...

गेल्या 12 वर्षांत सत्तेत असूनही अँटी इन्कम्बन्सीचा फारसा फटका न बसलेल्या भाजपसाठी राऊतांनी समोर आणलेलं सर्वेक्षण धक्का देणारं आहे...मात्र राम मंदिरापासून जेन झी आंदोलनापर्यंत भाजपची मौन बाळगण्याची भूमिका पक्षासाठी घातक ठरतेय...त्यात जेन झी आंदोलनानंतर तरुणांशी जोडून घेण्यासाठी भाजप तिंरगा रॅली, संवाद यात्रा काढत असलं तरी तरुणांशी कनेक्ट होण्यासाठी भाजपला धोरणांमध्ये अमुलाग्र बदल करण्याची गरज आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधी छात्रो की गुंजमधून तरुणांशी कनेक्ट होतायत.. त्यामुळे भाजप विरोधकांच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी काय ऱणनीती आखते? हे पाहणं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्रदारी वर्षा बंगल्यावर 'राज'कारण, दोन्ही नेत्यांमध्ये 'वर्षा'वर खलबतं?

‘शिवसेना कोणाची?’ सुनावणी सुरू असतानाच शिंदेसेनेला मोठं बळ; बड्या नेत्याचा पक्षप्रवेश

तुकाराम मुंढेंचा Dominos ला मोठा दणका! 3 आउटलेटचे परवाने निलंबित; मोठी खळबळ

Hot Chocolate Recipe: घरच्या घरी बनवा कॅफेसारखं क्रीमी आणि टेस्टी हॉट चॉकलेट, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update : पुण्यात आणखी एक ठिकाणी कारने घेतला पेट

SCROLL FOR NEXT