Nagpur Name Change saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut: नागपूरचे नाव बदलून दीक्षाभूमी करा! संजय राऊतांची मोठी मागणी

Nagpur Name Change: दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा वाद सुरू असतानाच संजय राऊत यांनी नागपूरचे नाव बदलून दीक्षाभूमी करण्याची मागणी केली आहे. सरकारने तातडीने प्रस्ताव तयार करावा, असे सांगत त्यांनी या निर्णयाला ठाकरे गटाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.

Surabhi Jayashree Jagdish

दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून सुरू असलेला वाद अद्याप कायम असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता नागपूरच्या नामांतराची मागणी केली आहे. नागपूरचे नाव बदलून ‘दीक्षाभूमी’ करण्यात यावे. सरकारने याबाबत तातडीने प्रस्ताव तयार करावा. या निर्णयाला आमचा पूर्ण पाठिंबा असेल, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी संपूर्ण देशाला अभिमान आणि श्रद्धा आहे. त्यांना खरी श्रद्धांजली वाहायची असेल, तर नागपूरचे नामांतर करून त्याला दीक्षाभूमी असे नाव द्यावे. दादर हे तुलनेने छोटे रेल्वे स्थानक आहे. त्यापेक्षा नागपूरचे नामांतर करणे ही बाबासाहेबांना मोठी श्रद्धांजली ठरेल. बाबासाहेबांच्या आयुष्यातील सामाजिक क्रांतीची सुरुवात नागपुरातून झाली. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतल्यास आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतराबाबत सरकारने घेतलेल्या भूमिकेवरही संजय राऊत यांनी टीका केली. नामांतरासंदर्भातील निर्णय ही प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते. यावर प्रतिक्रिया देताना, सरकार हीच एक प्रिंटिंग मिस्टेक आहे. हे सरकारच मिस्टेकने आले आहे, असा टोला त्यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : तुमचीही रात्री उशिरा जेवण्याची सवय आहे? वेळीच सावध व्हा, अन्यथा...

High Court : हायकोर्टाचा मोठा निर्णय! आधार कार्ड जन्मतारखेचा अंतिम पुरावा नाही

Winter Eye Care : हिवाळ्यात डोळ्यांमध्ये जळजळ अन् कोरडेपणा का वाढतो? 'ही' छोटी चूक ठरते कारण

Maharashtra News Live Update: देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह २९ नोव्हेंबर रोजी पुणे दौऱ्यावर

झोपण्यापूर्वी कोमट दूध प्यायल्याने खरच झोप चांगली लागते का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT