#PMkiShaadi : संजय राऊतांकडून 'PM' च्या लग्नाचं खास आमंत्रण; पत्रिकेचा फोटो होतोय व्हायरल! SaamTvnews
महाराष्ट्र

#PMkiShaadi : संजय राऊतांकडून 'PM' च्या लग्नाचं खास आमंत्रण; पत्रिकेचा फोटो होतोय व्हायरल!

राऊत यांच्या कन्येची लग्नपत्रिका सर्वांच्या चर्चेचा विषय ठरतोय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची कन्या पूर्वशी राऊत (Purvashi Raut) यांचा विवाह ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी उद्या २९ नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे. या विवाहसोहळ्याला विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थिती लावणार आहेत. पूर्वशी-मल्हार यांच्या हळदी समारंभाचे, संगीत कार्यक्रमाचे फोटो व खा.संजय राऊत आणि खा.सुप्रिया सुळे यांच्या डान्सचा देखील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे देखील पहा :

संजय राऊत यांनी लेकीच्या लग्नासाठी छापली खास लग्नपत्रिका

मात्र, राऊत यांच्या कन्येची लग्नपत्रिका सर्वांच्या चर्चेचा विषय ठरतोय. या पत्रिकेवरील #PMkiShaadi (पीएम की शादी) हा हॅशटॅग सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होतोय. संजय राऊत यांनी आपल्या लेकीच्या लग्नासाठी हि खास लग्नपत्रिका छापली आहे. संजय राऊत तसेच त्यांचे कुटुंबीय आपल्या कन्येच्या लग्नसोहळ्यात सध्या व्यस्त आहेत. प्रत्यक्ष लग्न समारंभाआधी हळदी समारंभ व संगीत कार्यक्रम अश्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

#PMkiShaadi हॅशटॅग होतोय ट्रेंड

संजय राऊत यांची कन्या पूर्वशी (Purvashi) यांच्या नावाचे आद्याक्षर (P) व मल्हार यांच्या नावाचे (M) या अक्षरांना घेऊन लग्नपत्रिकेवर #PMkiShaadi असे छापण्यात आले आहे. हा हॅशटॅग तयार करण्यात आला असून हॅशटॅग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. लग्नपत्रिकेचा हा फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होतोय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT