Sanjay Raut On Ajit Pawar Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut On Ajit Pawar: हातात तिजोरी आहे म्हणून निधीवाटप करायचा म्हणजे लुटमार; निधीवर्षावावरुन संजय राऊतांचं अजित पवारांवर टीकास्त्र

Maharashtra Political News: मंत्रिमंडळ विस्तारात अर्थमंत्री पदाची सूत्र त्यांच्या हाती देण्यात आली. त्यानंतर लगेचच त्यांनी आमदारामवर निधीवर्षाव केलाय.

Ruchika Jadhav

Sanjay Raut News: उपमुख्यमंत्री अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत सत्तेत आले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात अर्थमंत्री पदाची सूत्र त्यांच्या हाती देण्यात आलीत. त्यानंतर लगेचच त्यांनी आमदारांवर निधीवर्षाव केलाय. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊतांनी अर्थमंत्री अजित पवारांवर टीकास्त्र सोडलंय. (Latest Political News)

हातात तिजोरी आहे म्हणून निधीवाटप करायचा म्हणजे लुटमार आहे, अशा शब्दांत राऊतांनी अजित पवारांवर (Ajit Pawar) हल्लाबोल केलाय. पुढे ते म्हणाले की, निधीवाटपाचा असमतोल महाराष्ट्राचं राजकारण नासवणारं आणि खराब करणारं आहे, अशी खरमरीत टीका राऊतांनी केलीये.

पुढे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर देखील निशाणा साधलाय. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह मोदींची भेट घेतली होती. तसेच ही सदिच्छा भेट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकनाथ शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव केला. विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या ट्वीटर अकाउंटवर मराठीत ट्वीट करण्यात आलं होतं. यात त्यांनी लिहिलं होतं की, "महाराष्ट्राचे गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीची त्यांची तळमळ आणि विनम्र स्वभाव कौतुकास्पद आहे."

पंतप्रधानांच्या या ट्वीटवर देखील राऊतांनी निशाणा साधलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कष्टाचा वारसा अमच्याकडूनच मिळालाय. ही फार चांगली गोष्ट आहे, असं राऊतांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT