Maharashtra Election 2024 Sanjay Raut Saam Digital
महाराष्ट्र

Sanjay Raut : नरेंद्र मोदींचे नाणे घासून गुळगुळीत झालंय; संजय राऊत यांची टीका

Sanjay raut on narendra modi : नरेंद्र मोदींचे नाणे घासून-पुसून गुळगुळीत झालंय. आता मोदी-मोदी बाजारात चालत नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. ते संभाजीनगरमध्ये बोलत होते.

डॉ. माधव सावरगावे

मुंबई : 'नरेंद्र मोदींचे नाणे घासून-पुसून गुळगुळीत झालंय. आता मोदी-मोदी बाजारात चालत नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात दौरे सुरु केले आहेत. आज त्यांनी संभाजीनगरमध्ये भेट दिली. या दौऱ्यावर दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

'चंद्रशेखर बावनकुळे हे कालबाह्य झालेले ढब्बू पैसा आहे. श्रावणात मटण हा काय प्रचाराचा मुद्दा आहे का, प्रचाराचा स्तर एवढा खाली आणत असतील, तर त्यांना पराभवाची भीती आहे. भ्रष्टाचाराचे शेण खाण्यापेक्षा मटण खालेल्ल चांगलं, अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली.

प्रकाश आंबेडकर यांच्या आरोपावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, 'आम्ही भाजपचा दारूण पराभव करणार ते फिक्स. आम्हालाही कळते. प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत राहावे म्हणून अतोनात प्रयत्न केला. प्रेमाने हात जोडले. आम्ही त्यांना ६ जागा दिल्या. मात्र, त्यांना खोटं वाटत असेल. यावेळी नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण यांनी एकत्र येण्याची विनंती केली होती.

'आम्ही त्यांच्या विषयी कायम आदर ठेवू. देश संकटात असताना जे एकत्र राहत नाही, त्याची देश नोंद ठेवतात. प्रकाश आंबेडकर यांचे अनेकांशी वाद सुरू आहे. त्यांची भूमिका आणि विचार निकाल वेगळा होता. त्यांच्यासाठी सदैव आमचे दरवाजे उघडे आहेत, असे ते पुढे म्हणाले.

'शिंदे गटाचे उमेदवार भाजप दिल्लीत ठरवतो, यावरून त्यांची महाराष्ट्रत काय लायकी आहे हे समजते. आमचे अमोल कीर्तिकर बहुमताने विजयी होतील, असा दावा त्यांनी केला. 'राज्यातील अवकाळी पावसाचा गंभीर विषय असून या भागात मोदींनी यायला हवं. चिकन-मटण पेक्षा अवकाळी प्रश्न महत्वाचे आहेत, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bad Cholesterol Food: नसांना चिकटलेल्या घाणेरडा कोलेस्ट्रेरॉल बाहेर करण्यासाठी हे ४ पदार्थ नक्की खा

विधानसभेतला राडा भोवला, पडळकर अन् आव्हाड समर्थकांना तुरुंगवासाची शिक्षा|VIDEO

Border 2: सनी देओलची फौज 'बॉर्डर 2' साठी तयार; चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर

Women iron deficiency: पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये आयर्नची कमतरता का असते अधिक? काय असू शकतात कारणं जाणून घ्या

Samuruddhi Kelkar Video: अवखळ हासरी, अल्लड लाजरी; समृद्धी केळकरला पाहून चाहते झाले खुश

SCROLL FOR NEXT