Sanjay Raut - Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut on Eknath shinde : मुख्यमंत्री दाढी कापणार आहेत का...?; सावरकर यात्रेवरून राऊतांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल

आता सावरकर यात्रेवरून खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

जयश्री मोरे

Political News : राज्यात ३० मार्चपासून सावरकर गौरव यात्रेला सुरूवात झाली आहे. ही गौरव यात्रा २८८ मतदारसंघातून काढण्यात येणार आहे. नागरिकांना वीर सावरकर आणि त्यांच्या कार्याची माहिती तसेच इतिहासाची माहिती मिळावी यासाठी शिंदे- फडणवीस सरकारकडून ही यात्रा काढण्यात आली आहे. अशात आता सावरकर यात्रेवरून खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. (Savarkar Yatra)

सावरकरांना दाढी वाढवलेलं आवडत नाही तर आता शिंदे दाढी कापणार आहेत का? असा सवाल संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे यांना विचारला आहे. सावरकर यात्रेवरून सरकारला लक्ष करत राऊत म्हणाले की, " आज अनेक ठिकाणी सावरकर यात्रा निघत आहे. त्यांना ती यात्रा करुदे, परंतु सावरकरांनी या देशाला वैज्ञानिक दृष्टीकोण दिलेला आहे. त्याचे स्वागत केले पाहिजे. सावरकरांचे दिशा देणारे विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या सर्वांचे शिंदे-भाजप सरकार पालन करणार असेल तर त्यांचे स्वागत आहे.

सावरकरांनी हिंदुत्वाचा विचार करताना पुरोगामी आणि विज्ञानवादाला आधार दिलेला आहे. सावरकरांनी शेंडी जाणव्याच हिंदुत्व ते बाळासाहेबांनी देखील मानलं नाही. सावरकरांना दाढी वाढवलेली आवडत नाही तर आता शिंदे दाढी कापणार आहेत का? आता या रॅलीमध्ये एकनाथ शिंदे हे दाढी काढून येणार आहेत का? तुम्ही सावरकरांच्या विचारांची यात्रा काढत आहात मात्र तुम्ही सावरकरांचे साहित्य वाचले आहेत का?, असे प्रश्न राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले आहेत.

यात्रा काढणाऱ्यांनी आधी सावरकरांच्या साहित्याचे पारायण करा व साहित्य वाचा. त्यानंतर त्यांनी सावरकर यात्रा काढावी आणि भारतीय जनता पार्टीला देखील सावरकरांच्या विचारांचे पारायण करण्याची गरज आहे. उगाच आम्ही हिंदुत्ववादी आहोत असं बोलू नये, असा टोला राऊतांनी सरकारला लगावला आहे.

सरकारकडून अपेक्षा करणे म्हणजे रेड्याकडून दुधाची अपेक्षा करणे आहे

धमकी प्रकरणात सुरक्षेविषयी राऊत म्हणाले की, सरकारकडून आम्ही सुरक्षा मागे दिलेली नाही. सरकार हे विरोधकांच्या बाबतीत अत्यंत बेफिकीर आहे. त्यामुळे सरकारकडून सुरक्षेची अपेक्षा करणे म्हणजे रेड्याकडून दुधाची अपेक्षा केल्यासारखे आहे, असं राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असणार? तुमचा पगार कितीने वाढणार? समोर आली मोठी अपडेट

Milkcake Recipe: गोड खाण्याची इच्छा होत असेल तर झटपट घरच्या घरी बनवा स्वादिष्ट आणि मऊ मिल्क केक

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Controversy: पुतळ्यावरुन जातीय राजकारण पेटलं; अंजनगावातील जमिनीचा नेमका वाद काय?

Fansachi Rassa Bhaji Recipe : कोकणात बनवतात तशी फणसाची झणझणीत रस्सा भाजी, चाखाल अस्सल गावरान चव

SCROLL FOR NEXT