Sanjay Raut saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मुख्यमंत्री शिंदेंसह १६ आमदार शंभर टक्के अपात्र होणार, महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळणार - संजय राऊत

Sanjay Raut News: प्राणवायू लावला तरी आता ते जाणार जाणार आणि जाणार आणि महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळणार असे संजय राऊत म्हणाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Latest Marthi News: मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह 16 आमदार शंभर टक्के अपात्र ठरणार आणि महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळणार अशा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तुम्ही किती वाचवायचा प्रयत्न केला आणि त्यांना प्राणवायू लावला तरी आता ते जाणार जाणार आणि जाणार आणि महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळणार असे संजय राऊत म्हणाले आहेत.

विधानसबा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत बोलताना राऊत म्हणाले, अभ्यास किती काळ करायचा? त्याला काही मर्यादा आहेत. जर ढ विद्यार्थी असेल वर्षानुवर्षे एकाच वर्गात बसलेला असतो. पण आपण स्वत: वकील आहात, आपल्याला कायदा कळतो. ज्या पक्षामध्ये आपण आहात तो कायदा मानत नाही हे देशाला माहिती आहे. तो पक्ष अजिबात कायदा मानत नाही, संविधान मानत नाही, नितिमत्ता माहीत नाही. पण आपल्याला अनेक पक्षांचा अनुभव असल्याने कायदा माहिती आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले, आपण शिवसेनेचे वकील होता. सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलंय, हे आपल्याला चांगलं माहिती आहे. त्यामुळे आपण कितीही टंगळमंगळ केली तरी निर्णय घ्यावा लागेल. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह 16 आमदार शंभर टक्के अपात्र ठरणार.

तुम्ही किती वाचवायचा प्रयत्न केलात, त्यांना प्राणवायू लावलात, अमरत्वाची इंजेक्शन दिले तरी ते आता शक्य नाही. ते जाणार जाणार आणि जाणार आणि महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळणार असे संजय राऊत म्हणाले.

अजित पवार यांना अर्थखातं नव्हे तर मुख्यमंत्री होणार आहेत. हे मी सातत्याने सांगतोय आणि मी सांगतो म्हणजे होतंच. माझ्याकडे तेवढे संकेत असतात. महाराष्ट्र मध्ये मुख्यमंत्री बदल अटळ आहे. (Tajya Marathi Batmya)

राज ठाकरेंच्या भूमिकेवर राऊत म्हणाले....

राज ठाकरेंच्या कोणाशीही युती न करण्याच्या भूमिकेबाबत बोलताना राऊत म्हणाले, राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतलीये, ती त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. सगळ्या भूमिका फसल्यावर राजकारणात कधी कधी अशा भूमिका घ्याव्या लागतात. अनेक भूमिका घेत असतो मग त्याला उबग येतो आणि मग त्याला वाटतं की आपण तटस्थ काम करायला हवं. (Latest Political News)

राज ठाकरे - उद्धव ठाकरे युती

शिवसेना-मनसे युतीच्या चर्चांवर बोलताना राऊत म्हणाले, दोन भाऊ एकत्र येणार या चर्चा माध्यमांनी केल्या आहेत. ते दोघे भाऊ आहेत. त्यांना एकमेकांशी बोलायचं असेल राजकीय किंवा व्यक्तिगत असेल तर त्यांना मध्यस्थीची गरज नाही. एकमेकांना फोन लावून ते कधीही बोलू शकतात असं त्यांचं नातं आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Hindi Language Controversy : "मराठी बोलना जरुरी हैं क्या ?" म्हणणाऱ्या खारघरमधील परप्रांतीय तरुणाला मनसे कार्यकर्त्यांनी धडा शिकवला

Gold Rates: खरेदीला लागा! सोन्याच्या दरात घसरण, १० तोळं सोनं १,१०० रूपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Monsoon hepatitis symptoms: पावसाळ्यात गर्भवती महिलांना हिपॅटायटीस संसर्गाचा धोका; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Building Scam : ईडीची वसईत १२ ठिकाणी छापेमारी, माजी आयुक्तांच्या घरी टाकली धाड, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT