बिश्नोई गँगच्या नावाखाली राजकीय हत्या होऊ शकतात, संजय राऊतांचा दावा
दसरा मेळाव्यानंतर संजय राऊतांच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले
लॉरेन्स बिश्नोईच्या नावावरून संजय राऊत आणि भाजपमध्ये वाद
ठाकरेसेनेच्या दसरा मेळाव्यात राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहाच लॉरेन्स बिश्नोई असल्याचा आरोप केल्यानं राजकीय वातावरण चांगलचं तापलयं.अशातच बिश्नोईच्या नावाचा वापर करून राजकीय हत्या घडवून आणल्या जाऊ शकतात आणि त्याला साबरमती तुरुंगात संरक्षण दिलं जातयं, असा खळबळजनक दावाही राऊतांनी केला. आता राऊतांच्या या वक्तव्यानंतर आक्रमक झालेल्या भाजपनंही,मग ठाकरेंच्या सत्ताकाळात मनसुख हिरेनची हत्या उद्धव ठाकरेंनीच केली म्हणायचं का? असा सवाल केलाय.
दरम्यान टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर बॉलिवूडच्या कलाकारांमध्ये बिश्नोई गँगची दहशत निर्माण झालीय.. बिश्नोई टोळीनं याआधी कोणत्या राजकीय नेत्यांची हत्या केलीय आणि त्यांना धमक्या दिलेत.पाहूया.
5 डिसेंबर 2023
राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची बिश्नोई गँगकडून हत्या
बिश्नोई गँगचा सदस्य रोहित गोदारानं घेतली गोगामेडींच्या हत्येची जबाबदारी
12 ऑक्टोबर 2024
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची वांद्रे भागात बिश्नोई गँगकडून गोळ्या झाडून हत्या
8 जुलै 2026
काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगच्या नावानं जीवे मारण्याची धमकी आणि 10 कोटींच्या खंडणीची मागणी
सिद्धू मुसेवाला, बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि आता रोहित शेट्टी, टायगर श्रॉफसारख्या सेलिब्रिटींवर होणारे हल्ले यावरून बिश्नोई गँग फक्त धमक्या न देता प्रत्यक्षात गुन्हेगारी कृत्ये करून दहशत निर्माण करताना दिसतेय. अशातच बिश्नोई गँगच्या नावानं राजकीय हत्या होणार असल्याचा राऊतांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय क्षेत्रातही खळबळ माजलीय.मात्र गुजरातच्या साबरमती जेलमधून लॉरेन्स बिश्नोई आपली गँग चालवत असताना पोलिस प्रशासन बिश्नोईविरोधात कठोर निर्णय का घेत नाही? बिश्नोईला नेमकं कोण वाचवतयं? असे प्रश्न आजही अनुत्तरित आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.