Sharad Pawar , Sanjay Raut  Saam TV
महाराष्ट्र

'राऊत हे 100 टक्के पवारांचा माणूस, शिवसेना संपवून राष्ट्रवादीचे खासदार होतील'

'पगार सामानाचा घेतात आणि इमानी पवार साहेबांची करतात.'

अमोल कलये.साम टीव्ही रत्नागिरी

रत्नागिरीः : संजय राऊत (Sanjay Raut) हे 100 टक्के शरद पवार (Sharad Pawar) यांचा माणूस आहे. पगार सामानाचा घेतात आणि इमानी पवार साहेबांची करतात. संजय राऊत शिवसेना संपवून राष्ट्रवादीचे खासदार होतील अशी टीका भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. ते आज ते चिपळूणमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांच्यावरील तक्रारीवर निलेश राणे बोलत होते. फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामुळेच मविआ सरकार अडचणीत आलं आहे. त्यामुळे त्यांना अशा केसेस टाकून घाबरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. फडणवीस हे सर्वांना पुरून उरतील असे अनेक ठाकरे आणि पवार ते खिशात घेऊन फिरतात असही राणे म्हणाले.

यावेळी राणे यांनी संजय राऊतांवरती देखील टीका केली, ते म्हणाले, संजय राऊत यांना किती सिरीयस घ्यायचं हे आता पत्रकारांनी ठरवायला हवं. संजय राऊत यांनी आजवर किती विषय तडीस नेले हे सांगावे. संजय राऊत हे 100% शरद पवार यांचा माणूस आहे. पगार सामानाचा घेतात आणि इमानी पवार साहेबांची करतात. संजय राऊत शिवसेना संपवून राष्ट्रवादीचे (NCP) खासदार होतील असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरला येऊन फक्त षडयंत्र केलं जातंय- मनोज जरांगे

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

Pune News: दहीहंडीत अश्लील नृत्य, पुण्यात डान्सर निशा मुंबईकर अन् शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

SCROLL FOR NEXT