नवीन आरोपांच्या विरोधात संजय राठोडांचा खुलासा  
महाराष्ट्र

नवीन आरोपांच्या विरोधात संजय राठोडांचा खुलासा

एका महिलेने यवतमाळ पोलिसांना संजय राठोड यांच्यावर शरीरसुखाची मागणी केल्याची लिखित सविस्तर तक्रार पोस्टाने पाठवली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्राचे माजी वनमंत्री संजय राठोड पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यावेळी एका महिलेने त्याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. या संदर्भात महिलेने यवतमाळ पोलिसांना तक्रार पत्रही दिले आहे. तिच्या पतीची नोकरी परत मिळवून देण्याच्या बदल्यात राठोड यांनी संबंधित महिलेकडे सेक्सची मागणी केल्याचा आरोप महिलेने केला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याबाबत ट्विटरवर पोस्ट केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. यापूर्वी राठोड यांच्यावर पुण्यातील रहिवासी पूजा चव्हाणच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता. (Sanjay Rathore's revelation against new allegations)

हे देखील पहा-

याप्रकरणी पत्रकार परिषद घेत संजय राठोड यांनी खुलासा केला आहे. जुने प्रकरण शोधुन माझी राजकीय कारकिर्द संपण्याचा हा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप यावेळी संजय राठोड यांनी केला आहे. माझ्या सहकाऱ्यांचे फोन नंबर मिळवून त्यांना कॉल, मेसेज केले गेले. संजय नावाच्या साधर्म्यामुळे हा घोळ झाला. फेब्रुवारीत झालेल्या प्रकरणाचा आधार घेऊन माझ्यावर नवीन आरोप केले जात आहेत. स्थानिक आणि राज्यस्तरीय राजकीय फंडे वापरून माझा राजकीय प्रवास संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा पुनरुच्चार यावेळी संजय राठोड यांनी केला. तसेच, या प्रकरणाच्या दोन्ही बाजू उजेडात आणण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

दरम्यान, 7 फेब्रुवारी रोजी पुजा चव्हाण नावाच्या एका मुलीने पुण्यातील महंमदवाडी भागातील एका इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. याप्रकरणी तरुणीच्या आत्महत्येस संजय राठोड जबाबदार असल्याचे आरोप आरोप झाले होते. त्यानंतर त्यांनी २८ फेब्रुवारी रोजी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. मात्र याप्रकरणात पोलिसांनी क्लीन चिट दिल्याने संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद बहाल करण्यात येणार असल्याच्या चर्चा पुन्हा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manache Ganpati : बाप्पाच्या आगमनाची वेळ ठरली! पुण्यातील मानाचे ५ गणपती कधी विराजमान होणार? वेळ आणि पथकांची यादी एका क्लिकवर

Maharashtra News Live Update: पुण्यातील जांभूळवाडी येथील पुलावर भीषण अपघात

Sanjay Gaikwad : बाईबद्दलच्या त्या वक्तव्यानं आमदार संजय गायकवाड अडचणीत; मध्यरात्री थेट गुन्हा दाखल

IAS Officer ला सस्पेंड करण्याचा अधिकार नेमका कोणाकडे असतो? राज्य की केंद्र सरकार?

Daughter Property Rights : मुलींना वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा कधी मिळत नाही? काय आहेत नियम, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT