SANJAY GAIKWAD BOOKED OVER OBJECTIONABLE REMARK saam tv
महाराष्ट्र

बापासारखं शरीर कुठून आणणार? संजय गायकवाडांना आक्षेपार्ह विधान भोवलं

Sanjay Gaikwad in Trouble Again: शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे बुलढाण्यात भाजपनं एकप्रकारे शिंदसेेनेला थेट आव्हान दिल्याची चर्चा सुरूये. गायकवाडांविरोधात गुन्हा का दाखल झालाय?... यामागे महायुतीत शह-काटशहाचं राजकारण दडलंय का?... पाहूयात यावरचा रिपोर्ट...

Rohit Kadam

ऐकलंत... हे विधान केलंय... शिंदेसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी... त्याचं झालं असं की, चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांच्या पतीच्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यात आयोजित कार्यक्रमादरम्यान वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर नंतर महालेंनी संजय गायकवाड यांचं नाव न घेता टोला लगावला होता. यावर आमदार संजय गायकवाड यांनीही आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिली होती. आक्षेपार्ह प्रतिक्रियेप्रकरणी एका 42 वर्षीय महिलेनं गायकवाडांविरोधात तक्रार दिली.

या तक्रारीनुसार, आमदार गायकवाडांविरोधात कलम 79 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. गायकवाड काय बोलले होते ते पाहूया...दरम्यान, शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड याआधीदेखील वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिलेत. शिकारीसह वाघाचा दात गळ्यात घातल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. विरोधी पक्षनेते राहुल गांधींबाबत प्रक्षोभक विधान केल्यानं राज्यात वाद निर्माण झाला होता. आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचे आणि शिळे अन्न दिल्याच्या कारणावरून कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. कॉ. गोविंद पानसरेंच्या 'शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती

खरंतर, एप्रिल 2026 मध्ये प्रशांत आंबी यांनी कोल्हापुरात संजय गायकवाड यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. मात्र, अद्यापही पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्यानं संताप व्यक्त होत आहे. मात्र, आता भाजप आमदाराविरोधातील आक्षेपार्ह विधानानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई केलीये. त्यामुळे गायकवाड यांच्यावरील कारवाईमागे बुलढाण्यातील राजकीय वर्चस्वाची पार्श्वभूमी आहे का ? अशी चर्चा रंगू लागलीये. महाले विरुध्द गायकवाड यांच्यात वाद दिवसेंदिवस वाढत असतानाच या कारवाईमुळे शिंदे सेना विरुद्ध भाजपमधील शह-काटशहाचं राजकारण पुन्हा एकदा अधोरेखीत झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोकणवासियांच्या प्रवासात खड्ड्यांचं विघ्न, मुंबई-गोवा महामार्गांवर वाहतूक कोंडी

गोकुळ निवडणुकीत नवा ट्विस्ट, 492 संस्थांच्या पात्रतेला सुप्रीम कोर्टात आव्हान

मराठा आरक्षण प्रकरणी सरकार अॅक्शन मोडवर; जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर खलबतं सुरू

BRICS साठी 2 डझन देश एकत्र; भारताच्या नेतृत्वात झाले 5 मोठे निर्णय

Maharashtra News Live Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची उद्या दुपारी महत्त्वाची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT