sanjay biyani
sanjay biyani saam tv
महाराष्ट्र

संजय बियाणींच्या पत्नीचा दिरावर संशय; विमानतळ पाेलीसांत गुन्हा दाखल

संतोष जोशी

नांदेड : बांधकाम व्यावसायिक (कै.) संजय बियाणी (sanjay biyani) यांच्या पत्नी अनिता यांनी हार्ड डिस्क चाेरी प्रकरणी त्यांचे दिर प्रवीण बियाणी (pravin biyani) यांच्या विराेधात विमानतळ पोलिस (police) ठाण्यात रात्री उशिरा तक्रार दाखल केली. त्याची दखल घेत पाेलीसांनी (nanded police) प्रविण बियाणी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (sanjay biyani latest marathi news)

संजय बियाणी यांच्या सुमारे दाेन महिन्यांपुर्वी हत्या झाली. या प्रकरणी नऊ जणांना नांदेड पाेलीसांनी अटक केली आहे. बियाणी यांची हत्या खंडणीसाठी झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.

दरम्यान बियाणी यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटूंबात गृहकलह सुरु झाला आहे. संजय बियाणी यांच्या पत्नीने दीर प्रविण यांनी राज माॅल मधील कार्यालयातून फायनान्सच्या आर्थिक देवाण घेवाणीचा डाटा असलेला एक टीबी डाटा चोरुल्याचा आरोप करत विमानतळ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा तक्रार दाखल केली.

या प्रकरणी प्रविण बियाणी विरोधात माहिती व तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत 380 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय बियाणी यांच्या हत्येमागील मास्टरमाइंड खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा असल्याचे बाब उघड झाल्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे.

बियाणी यांच्या खुनाचे रहस्य उघडत असतानाच बियाणींच्या कुटूंबात गृहकलह सुरू झाला आहे. प्रविण बियाणी यांना छातीत दुखत असल्याने कालच (रविवारी) खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM मोदींनी चार टप्प्यांत 270 चा जागांचा टप्पा ओलांडला, अमित शहा यांचा दावा

Eggs : उकडलेली अंडी किती दिवस टिकतात?

Singham Again Shooting In Jammu : 'सिंघम अगेन'च्या सेटवरून फायटिंगचा सीन व्हायरल; अजय- जॅकी एकमेकांना भिडले...

SRH vs PBKS: अखेरच्या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांची बॅट तळपली! हैदराबादसमोर विजयासाठी २१५ धावांची गरज

Today's Marathi News Live: पिंपरी चिंचवड शहरात आज पुन्हा वळवाच्या पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT