शहादा शहरात 'माझी वसुंधरा' उपक्रमाअंतर्गत स्वच्छता अभियान... दिनू गावित
महाराष्ट्र

शहादा शहरात 'माझी वसुंधरा' उपक्रमाअंतर्गत स्वच्छता अभियान...

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात माझी वसुंधरा उपक्रमाअंतर्गत स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यावेळी दिवाळीनिमित्त शहर स्वच्छता ठेवण्याचा संकल्प करण्यात आला.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार: केंद्र व राज्य शासनाच्या वतीने आयोजित 'माझी वसुंधरा' उपक्रमांतर्गत शहादा शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.‌ यावेळी शहरातील शिवाजी चौकापासुन ते जुने पोलीस स्टेशनपर्यंत साफसफाई करण्यात आली. (Sanitation campaign under 'Majhi Vasundhara' initiative in Shahada city)

हे देखील पहा -

दिवाळीनिमित्त शहरातील नागरिकांनी शहादा शहर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करावा जेणेकरून रोगराई टाळता येईल व शहर स्वच्छ राहिल्यास नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल असे आव्हान संकल्प ग्रुपच्या वतीने करण्यात आले. या साफसफाई अभियानात शहादा नगरपरिषदेचे साफसफाई कर्मचारी, शहरातील सजग नागरिक व संकल्प ग्रुपचे सदस्य यांनी हिरीरीने भाग घेऊन शहादा शहर स्वच्छ करण्यासाठी सहभाग नोंदवला. या अभियाना अंतर्गत वृक्षलागवडही करण्यात आली. तसेच प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणाचा समतोल राखून वृक्षलागवड व स्वच्छता मोहिमेची शपथ संकल्प ग्रुपच्या वतीने देण्यात आली.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT