lockdown 
महाराष्ट्र

अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने लाॅक; जिल्हाधिका-यांचा नवा आदेश

भारत नागणे

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यात येत्या १३ ऑगस्टपासून पुढील आदेश येइपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी‌ काढले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने पुर्णत: बंद ठेवावीत अशी सूचना करण्यात आली आहे. नव्या आदेशानुसार जिल्ह्यातील माढा madha, माळशिरस malshiras, करमाळा karmala, सांगोला sangola आणि पंढरपूर pandharpur या तालुक्यांतील गावांत कडक निर्बंध राहणार आहेत.

साेलापूर जिल्ह्यातील माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. या तालुक्यांत काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी प्रशासनाने लाॅकडाउन lockdown अंतर्गत कडक निर्बंध लावण्याचे आदेश जारी केले आहेत.

त्यानूसार पंढरपूरसह पाच तालुक्यांमध्ये येत्या १३ ऑगस्ट पासून अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद ठेवावीत, अत्यावश्यक सेवांची दुकाने दुपारी चार पर्यंत सुरू ठेवावीत, मेळावे, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना पूर्णत: बंदी, विवाह सोहळ्यास ५० ऐवजी २५ लोकांची उपस्थिती हवी, खासगी आणि सार्वजनिक प्रवासी वाहतूक तसेच माल वाहतुक सुरू राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे येणाऱ्या भाविकांची संख्या देखील कमी झाली आहे. त्यातच आता संचार बंदीचा निर्णय घेतल्याने व्यापाऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur News : बदलापुरात चाललंय काय? आधी सभापतींना धक्काबुक्की, आता कंत्राटावरून सभापती-पालिका अधिकाऱ्यामध्ये झटापट?

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कवर उद्या सीजीपेचे आंदोलन

Skin Care: चेहरा हायड्रेट आणि ग्लोईंग पाहिजे? मग रोज रात्री लावा 'ही' २ मिनिटात तयार होणारी पेस्ट

शिक्षक-पदवीधर निवडणुकीत पहिलं बंडाचं निशाण; शिंदेसेनेत उफाळली नाराजी, निष्ठावंतानं भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

Property Rights: पत्नीनं वडिलांच्या पैशांनी घेतलं घर, तिचा पती होऊ शकतो का मालक? हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT