sangli , sindhudurg, tourists, bhuibawada ghat saam tv
महाराष्ट्र

भुईबावडा घाटातील धबधब्याजवळून दरीत पडून सांगलीतील युवकाचा मृत्यू

मंळवारी सायंकाळी घडली घटना.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : भुईबावडा घाटात सांगली (sangli) येथील एका पर्यटकाचा धबधब्याखाली आंघोळ करताना पाय घसरून दरीत कोसळल्याने मृत्यू झाला. मित्राच्या घरचा पाहुणचार करून गावी परतणारे सांगलीतील काही युवक मंगळवारी भुईबावडा घाटात (bhuibawada ghat) धबधबा (Waterfall) पाहून थांबले. धबधब्याखाली आंघोळ करत असताना रोहन चव्हाण (Rohan Chavan) या युवकाचा (Youth) पाय घसरला. सायंकाऴच्या सुमारास घटना घडली हाेती. आज (बुधवार) राेहनचा मृतदेह हाती आला. (sindhudurg latest marathi news)

भुईबावडा घाट परिसरात मंगळवारी सायंकाळी पाण्याच्या जोरदार प्रवाहाने एका २९ वर्षीय तरुणाला दरीत वाहून आपला जीव गमवावा लागला. वैभववाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन यशवंत चव्हाण असे मृताचे नाव असून तो सांगलीतील कापड पेठ येथील रहिवासी आहे.

सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील म्हणाले, प्राथमिक माहितीनुसार रोहन यशवंत चव्हाण हा त्याच्या मित्रांसह घटनास्थळी आला होता. सायंकाळी ५ वाजता चव्हाण पाण्यात खेळत असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहाने ताे खोल दरीत वाहून गेला. या घटनेता त्याचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात सोमवार ते मंगळवार सकाळदरम्यान सुमारे ७.७ मिली मीटर पाऊस झाला. पंचगंगा नदीच्या पातळीत मंगळवारी दाेन फुटांनी वाढ झाली. त्यामुळे राजाराम बंधारा पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे.

राजाराम बंधाऱ्यात नदीचे पाणी १७ फूट ९ इंच इतके मोजले गेले. तसेच नदीवरील तब्बल सात बॅरेजेस सध्या पाण्याखाली आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, राधानगरी धरणात सध्या सुमारे 75 टक्के साठा आहे आणि सुमारे 1,500 क्युसेक विसर्ग सुरू आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi UAE Visit: तेल साठे ते एलपीजी पुरवठा; पंतप्रधान मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळाले?

Tragic Road Accident : भीषण अपघात! ट्रक धडकल्यानंतर प्रवाशांनी भरलेला ट्रॅक्टर तुंगभद्रा पुलावरून कोसळला, ६ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: नागपूरचे तापमान 45 अंश सेल्सिअसवर पोहचले

Shocking: पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना, २ महिलांचे केस कापून अर्धनग्न करत धिंड काढली

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाताचा थरार, ३ मोठे ट्रक उलटले; २ जणांचा मृत्यू, वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT