Sangli : रांगोळीतून साकारल्या महिला अत्याचारांच्या छटा! विजय पाटील
महाराष्ट्र

Sangli : रांगोळीतून साकारल्या महिला अत्याचारांच्या छटा!

सांगलीत मी सक्षमा ग्रुपकडून महिलांसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. रांगोळीतून महिला अत्याचाराचा संताप पाहायला मिळाला.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : सांगलीत रांगोळीतून महिला अत्याचाराचा संताप पाहायला मिळाला. 'मी सक्षमा ग्रुप'च्या रांगोळी स्पर्धेत, स्पर्धक महिलांनी महिला अत्याचाराची व्यथा आणि कथा मांडणाऱ्या रांगोळ्या काढत, वाढत्या महिला अत्याचाराविरुद्ध संताप व्यक्त केला. सांगलीत मी सक्षमा ग्रुपकडून महिलांसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

हे देखील पहा :

पूजा विशाल पाटील यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत महाराष्ट्राचे सण, महिला अत्याचार, कोरोनानंतरचे जग, आपला आवडता सण असे विषय देण्यात आले होते. यामध्ये बहुतांशी महिलांनी महिला अत्याचार हा विषय निवडत महिला अत्याचार दर्शविणाऱ्या बोलक्या रांगोळ्या काढून स्पर्धेच्या माध्यमातून महिलांवरील अत्याचाराला वाचा फोडली आहे.

याचबरोबर मुली वाचवा, स्त्री शक्ती यासारख्या विषयावर प्रकाश झोत टाकणाऱ्या रांगोळ्या चर्चेचा विषय बनल्या आहेत. या रांगोळी स्पर्धेमुळे महिलांना आपल्या भावना आणि समाजात महिला अत्याचार वाढले आहेत, हे मांडण्याचे मोठे व्यासपीठ 'मी सक्षमाच्या' माध्यमातून मिळाले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

PF Privacy : कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! खासगी कंपन्या तुमचा PF-ITR डेटा पाहू शकतात का? वाचा...

SCROLL FOR NEXT