Sangola highway accident Saam Tv News
महाराष्ट्र

Sangli Accident : भरधाव ट्रकची बाईकला समोरुन धडक, दोन तरुणांचा जागीच अंत; शेगाववर शोककळा

Sangola Highway Bike Accident : सकाळी दोघेजण दुचाकीवरून शेगाववरून जतकडे निघाले होते. जतपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या सागर बाहुबली कापड दुकानाजवळ आले असता समोरून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली.

Prashant Patil

सांगली : सांगोला महामार्गावर जतपासून चार किलोमीटर अंतरावर ट्रक आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील देवदत्त दिलीप शिंदे (वय २०) आणि यशराज नाना शिंदे (वय १५) हे दोघेजण जागीच ठार झाले आहेत. अपघातात मृत झालेला देवदत्त शिंदे हा तरूण चालक म्हणून काम करीत होता. तर यशराज हा इयत्ता आठवीमध्ये शिकत होता. दोघेही शेगावमध्ये राहत होते.

सकाळी दोघेजण दुचाकीवरून शेगाववरून जतकडे निघाले होते. जतपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या सागर बाहुबली कापड दुकानाजवळ आले असता समोरून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की यशराज हा जागीच मृ्त्यू झाला. गंभीर जखमी देवदत्तला जत ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, त्याचाही मृ्त्यू झाला आहे. अपघातात दुचाकी ट्रकमध्ये घुसून चक्काचूर झाला. अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक थांबवून तेथून पळ काढला. जत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृत यशराजचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालयात आणला. अपघातात दोघे युवक मृत झाल्यामुळे शेगाव गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एल निनोमुळे खरिपानंतर रब्बी पिकांवरही संकट; देशात अन्नधान्याचा तुटवडा भासणार?

Healthy Lifestyle : सिगारेट-दारूपेक्षाही खतरनाक आहे 'ही' १ गोष्ट, मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Wednesday horoscope: रखडलेलं काम होईल, वायफळ खर्च करू नका; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

SCROLL FOR NEXT