sangli crime news, police saam tv
महाराष्ट्र

Sangli Crime News : सांगलीत युवकास मारहाण; आठ जणांवर गुन्हा दाखल

मध्यरात्री हा सर्व प्रकार घडला. त्यानंतर युवकानं पाेलिसांत तक्रार दिली.

विजय पाटील

सांगली : कंपनीतील काम सोडल्याचा रागातून चिडून जाऊन बालाजी मोहन भोसले या युवकावर आठ जणांनी हल्ला केला. या प्रकरणी सांगली शहर पाेलिसांनी (police) भाेसले याच्या तक्रारीनंतर आठही जणांवर गुन्हा दाखल केला. (Sangli Latest Marathi News)

या घटनेबाबत पाेलिसांत नाेंदविलेल्या तक्रारीत बालाजी भोसले याने कंपनीतून काम सोडल्याचा रागातून चिडून जाऊन आठ जणांनी त्याला प्लॅटच्या खाली बोलावले. तेव्हा अर्जुन पाटील याने हेलमेटने बालाजीच्या डोक्यात पाठीत मारहाण केली. संतोष घाडे यांनी जीवे मारण्याची धमकी देत बालाजीचा मोबाईल काढून घेतला. इतर संशयितांनी त्याला मारहाण केली.

दरम्यान मारहाणी नंतर बालाजीला जबरदस्तीने गाडीत घालून विश्रामबाग येथे नेले. पोलिसांनी हा प्रकार कळल्यानंतर तात्काळ चौकशी सुरू केली. यावेळी पोलिसांनी संशयितास फोन केल्यानंतर बालाजीला आंबराई येथे आणून सोडले.

त्यानंतर बालाजीने सांगली शहर पोलीस ठाण्यात आठ जणांविराेधात तक्रार दिली. याप्रकरणी लक्ष्मण भानुसे, अर्जुन पाटील, संतोष घाडी, सतीश पुडलिंक उर्फ बंडू, रवी गावडे, अज्ञात चालक आणि दुचाकीवरील तरुण अशा आठ जणांविरोधात सांगली शहर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manache Ganpati : बाप्पाच्या आगमनाची वेळ ठरली! पुण्यातील मानाचे ५ गणपती कधी विराजमान होणार? वेळ आणि पथकांची यादी एका क्लिकवर

Maharashtra News Live Update: पुण्यातील जांभूळवाडी येथील पुलावर भीषण अपघात

Sanjay Gaikwad : बाईबद्दलच्या त्या वक्तव्यानं आमदार संजय गायकवाड अडचणीत; मध्यरात्री थेट गुन्हा दाखल

IAS Officer ला सस्पेंड करण्याचा अधिकार नेमका कोणाकडे असतो? राज्य की केंद्र सरकार?

Daughter Property Rights : मुलींना वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा कधी मिळत नाही? काय आहेत नियम, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT