Sangali Police Saam TV
महाराष्ट्र

सावकारी करत माजवली दहशत; पोलिसांनी छापा टाकल्यानंतर हाती लागलं मोठं घबाड

Sangali Police : सांगली जिल्ह्यासह शहरातील विठ्ठलनगर परिसरात बेकायदेशीर सावकारी करून दहशत माजवणाऱ्या सावकारी रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : सांगली जिल्ह्यासह (Sangali) शहरातील विठ्ठलनगर परिसरात बेकायदेशीर सावकारी करून दहशत माजवणाऱ्या सावकारी रॅकेटचा (Private Moneylender) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 20 कोरे स्टॅंप, वेगवेगळ्या बॅंकेचे 78 चेक, पाच खरेदी दस्त, नोटरी, सात दुचाकी व चारचाकी कारसह अनेक मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिसांनी (Sangali Police) केलेली कारवाई ही जत तालुक्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुभाष उर्फे लखन पवार याच्याविरोधात सावकारी तसेच खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. (Sangali Police Latest News)

एका फिर्यादीच्या तक्रारीवरून जत पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तक्रारदार व्यक्तीने संशयित आरोपीकडून 2021 साली 1 लाख 50 हजार रुपये व्याजाने घेतले होते. या पैशांवर आरोपी पवार हा आठवड्याला 12 टक्के व्याज आकारत होता. घेतलेले पैसे तक्रारदाराने व्याजासहीत परतही केले होते. मात्र त्यानंतर आरोपी पवार याने तक्रारदाराकडे पैसे बाकी असल्याचा तगादा लावला होता. तसेच आरोपीने तक्रारदाराला 10 हजार रुपये दे अन्यथा तुझे अपहरण करू अशी धमकीही दिली होती. त्यानंतर तक्रारदाराने जीवावर उदार होऊन गुरूवारी पोलिसांत धाव घेतली.

दरम्यान, पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर जत पोलिसांनी रात्री अचानक आरोपी लखन पवार याच्या घरावर छापा टाकला. मात्र, पोलीस येण्याची खबर लागताच आरोपीने घरातून धूम ठोकली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या घरातून वेगवेगळ्या व्यक्तीच्या नावे असलेले 20 कोरे स्टँप, वेगवेगळ्या बँकेचे 78 चेक, 5 खरेदी दस्त, नोटरी, सात दुचाकी आणि चारचाकी कार, ट्रँक्टरचे आरसी बुक, टीटी फाँर्म, 2 हिशोबाच्या वह्या तसेच आरोपीचे वेगवेगळ्या बँकेचे पासबुक, एक कँलक्युलेटर, असा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी केलेली कारवाई ही जत शहरातील सावकारी विरोधात सर्वात मोठी कारवाई आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी लखन पवार याच्याविरोधात सावकारी अधिनियम तसेच खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, फरार असलेला आरोपी लखन पवार याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शहादा समाज कल्याण वस्तीगृहात 40 विद्यार्थ्यांना विषबाधा प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

बुलेट ट्रेनबाबत मोठी अपडेट; आधी कोणत्या दोन स्टेशन दरम्यान धावणार ट्रेन, कधी होणार लोकार्पण?

Diabetes and Tamarind: रक्तातील साखर कमी करण्यासाठी चिंचेच्या बिया उपयोगी? डॉक्टरांचा मोठा खुलासा

भाजपच्या दिग्गज नेत्याच्या एकुलत्या एक मुलाचे भुसावळमध्ये अपघाती निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

गावरान स्टाईलमध्ये बनवा हिरव्या माठाची भाजी, रेसिपी आहे एकदम सोपी

SCROLL FOR NEXT