Suicide Saam tv
महाराष्ट्र

धक्‍कादायक..पोलीस ठाण्यातच तरुणाची आत्महत्या; महिला सावकाराचा त्रास

धक्‍कादायक..पोलीस ठाण्यातच तरुणाची आत्महत्या; महिला सावकाराचा त्रास

विजय पाटील

सांगली : एका महिला सावकाराच्या वसुलीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने थेट पोलिस ठाण्यातच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीमध्ये घडला आहे. शहर पोलीस (Police) ठाण्याच्या टेरेसवर या तरुणाने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने सांगली (Sangli) शहरांमध्ये खळबळ उडाली आहे. (sangli news Young man commits suicidein police station)

अतुल गरजे-पाटील असे या तरुणाचे नाव असून अतुल हा शहर पोलीस ठाण्यात साफसफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. तर एका महिला सावकाराच्या वसुलीच्या जाचाला कंटाळून त्याने ही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला. मात्र शहर पोलीस ठाण्यात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

आत्‍महत्‍येपुर्वी लिहिली सुसाईड नोट

दरम्यान आत्महत्येपूर्वी अतुल पाटील याने एक चिट्ठी लिहिली असून ती पोलिसांच्या हाती लागली आहे. ज्यामध्ये सावकार महिलेचा नावाचा उल्लेख असून वसूलीच्या तगद्याला कंटाळून आत्महत्या केल्याचे अतुल याने चिट्ठीत नमूद केल्याचे पोलिसांच्याकडून सांगण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास सांगली शहर पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT