Sangli Bribe Case Saam tv
महाराष्ट्र

Sangli Bribe Case : सांगली पोलिसात खळबळ; ५० हजाराची लाच घेताना महिला पोलीस ताब्यात

Sangli News : पोलिसात एका जणा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. मात्र या गुन्ह्यात मदत करण्यासाठी महिला पोलीस हवालदार मनीषा कोनोळीकर उर्फ बडेकर यांनी लाचेची मागणी केली

विजय पाटील

सांगली : सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात कार्यरत महिला हवालदाराला ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. फसवणुकीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी ही लाच मागितली होती. रात्रीच्या सुमारास सांगलवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे सांगली पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. 

सांगलीच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात कार्यरत मनीषा कोनोळीकर उर्फ बडेकर असे एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या महिला पोलीस हवालदाराने नाव आहे. दरम्यान पोलिसात एका जणा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. मात्र या गुन्ह्यात मदत करण्यासाठी महिला पोलीस हवालदार मनीषा कोनोळीकर उर्फ बडेकर यांनी लाचेची मागणी केली. मात्र तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दिली. 

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या प्रकरणी तक्रारीची पडताळणी करून पथकाने काल रात्री सांगलवाडी येथे सापळा रचला. याठिकाणी तक्रारदाराकडून महिला हवालदार मनीषा बडेकर यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. 

पोलिसात गुन्हा दाखल 

दरम्यान महिला हवालदार बडेकर यांना एसीबीने ताब्यात घेतल्यानंतर संशयित पोलीस कर्मचारी विरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. दरम्यान सदरच्या कारवाईमुळे सांगली पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: MPSC च्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

SCROLL FOR NEXT